कृषी विद्यापीठाची कृषीदर्शनी म्हणजे आधुनिक ज्ञानेश्वरी

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारी कृषीदर्शनी प्रकाशित केली आहे. या कृषीदर्शनी चे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टीक तृणधान्य प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांना कृषीदर्शनी चे मोफत वाटप कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. नेवासा तालुक्यातील धनगरवाडी येथे कृषी सहाय्यक श्रीमती मंदाकिनी दहातोंडे यांनी शेतकरी गट स्थापन केला आहे. या शेतकरी गटामार्फत कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य योगेश वाल्हेकर होते.

याप्रसंगी डॉ. ढगे म्हणाले की कृषी शास्त्रज्ञांनी संशोधन करून विविध पिकावर आधुनिक तंत्रज्ञान तयार केले आहे. त्याची सर्व सविस्तर माहिती कृषीदर्शनी मध्ये दिली आहे. शेतकऱ्यांनी कृषीदर्शनी मनोभावे वाचून तिच्या ज्ञानाचा उपयोग शेतीमधील शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी करावा. कारण सर्व पिकांची इतंभूत माहिती आधुनिक तंत्रज्ञान यावर या डायरी मध्ये वापर करण्यात आला आहे. प्राप्त स्थितीमध्ये अनेक शेतकरी सुशिक्षित व तरुण आहेत. त्यांनी याचे वाचन केल्यास निश्चितच त्यांना फायदा होईल.

याप्रसंगी शेतकऱ्यांनी विविध प्रात्यक्षिक प्रयोगांना भेटी दिल्या. गटाचे अध्यक्ष अशोक वाल्हेकर, सचिव सूनील वाल्हेकर, गंगाराम भागवत, बाबुराव वाल्हेकर, दीपक वाल्हेकर, जगन्नाथ वाल्हेकर, जगदीश चौधरी, योगेश शिंदे, बाबासाहेब काळे, सुभाष तनपुरे, भरत कारले या शेतकऱ्यांच्या शेतावर उत्तम प्रकारची पिके असल्यामुळे त्यांचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी कौतुक केले. कृष्णकांत ससे यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या