महिला सक्षमीकरण आणि समाज परिवर्तन यासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे महत्वपूर्ण योगदान : डॉ.सुधाताई कांकरिया

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : “स्वराज्या कडून सुराज्याकडे जाण्यासाठी आझादी के अमृत महोत्सव से स्वर्णीम भारत की और हा महत्वपूर्ण उपक्रम असुन स्वच्छ भारत अभियान, हरित भारत - स्वस्थ भारत, योग विद्या, महिला सक्षमीकरण आणि समाज परिवर्तन यासाठी देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे,त्यामुळेच या शहराला अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत,महिला भगिनींनी आता पुढाकार घेऊन स्वच्छता व पर्यावरण संवर्धन या अनुषंगाने काम केले पाहिजे,” असे मत बेटी बचाव ! बेटी पढाव ! अभियान च्या समन्वयक डॉ.सुधाताई कांकरिया यांनी व्यक्त केले.

देवळाली प्रवरा नगरपरिषद व ओम शांती केंद्र च्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वर्णीम भारत की और कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमास माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम,देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,राहुरीच्या नंदा दिदी,माजी सनदी अधिकारी दत्ता पा.कडू, देवळालीप्रवरा केंद्राच्या विजया दिदी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात बेटी बचाव ! बेटी पढाव ! अभियान च्या समन्वयक डॉ.सुधाताई कांकरिया यांनी स्वच्छ भारत अभियान, हरित भारत- स्वस्थ भारत, योग विद्या, महिला सक्षमीकरण आणि समाज परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी देवळालीप्रवरा नगरपरिषद अंतर्गत स्वच्छ भारत अभियान २०२२ व वसुंधरा संवर्धन अभियान २.० अंतर्गत कार्याची व विविध योजनांची माहिती दिली.

देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे स्वच्छता व पर्यावरण दूत हसन सय्यद यांनी राहूरी फॅक्टरी येथील श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील विदयार्थ्याचे स्वच्छ भारत अभियान व वसुंधरा संवर्धन यावर पथनाट्य तयार करून सादर केले.जनजागृती पथनाट्यसाठी हायस्कूलचे विशाल तागड,युसूफ तांबोळी, नितीन घोलप आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थांनी सादर केलेल्या प्रबोधनात्मक पथनाट्यास माजी आमदार चंद्रशेखर पा कदम यांनी रोख पारितोषिक दिले. यावेळी दत्ता पा.कडू, नंदा दिदी, बाळासाहेब कापसे यांनी शुभेच्छा दिल्या. ओम शांती केंद्र देवळालीप्रवरा च्या वतीने विद्यार्थिनीनी विविध गीते सादर करून शांती चा संदेश दिला. यावेळी प्रियातमाताई कदम, माजी नगरसेविका संगीताताई चव्हाण, नगरपरिषचे कार्यालयीन अधीक्षक बन्सी वाळके, एस.के.मोटे, अमोल दातीर, कपिल भावसार, राजेंद्र हारगुडे, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, महिला आर्थिक विकास महामंडळ च्या वंदना आल्हाट, समुदाय संघटिका सविता हारदे यांच्या सह परिसरातील महिला बचत गटांच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषदेचे सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया दिदी यांनी केले. शेवटी सहा. ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी आभार मानले. यावेळी वेलनेस सेंटर चे बाळासाहेब हापसे, सोमनाथ हापसे, शुभांगी कडू यांच्या टिमने महिलांची आरोग्य तपासणी करून हेल्थ कार्ड तयार करून दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या