देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : वर्षभर आरोग्य विभागात शहराची साफसफाईचे काम करणाऱ्या महिलाच खऱ्या रणरागीणी आहेत. जागतिक महिला दिनापासुन या दुर राहतात. शिवबा प्रतिष्ठाणच्या वतीने सफाई कर्मचारी महिलांचा पैठणी देवून सन्मान करण्यात आला. खऱ्या अर्थाने उपेक्षित महिलांचा सन्मान झाल्याने महिलादिन खऱ्या अर्थाने देवळाली प्रवरात साजरा झाला असल्याचे सफाई महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या बोलीभाषेत सांगितले.
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या आरोग्य विभागात साफसफाई ठेकेदारी व कायम कामगार महिला यांचा महिला दिनानिमित्त नगर पालिकेच्या प्रांगणात मुख्याधिकारी अजित निकत, माजी नगरसेवक अदिनाथ कराळे, शिवबा प्रतिष्ठानचे मावळे सिद्धार्थ कड, अमोल कुऱ्हाडे, विवेक विश्वासराव, अमोल वाळके, बंटी शिंदे, शुभम वास्कर, नागेश शेकडे, कृष्णा डोंगरे,कार्यालयीन अधिक्षक बन्सी वाळके, कृष्णा महांकाळ आदींच्या हस्ते महिला सफाई कामगार यांना पैठणीचे वाटप करुन सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक अदिनाथ कराळे म्हणाले की, देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी भागात पहाटे चार वाजल्या पासुन साफसफाईचे काम करणाऱ्या महिलाच आजच्या महिला दिना निमित्त खऱ्या रणरागिणी आहेत.महिला दिना निमित्त सर्वच ठिकाणी कार्यक्रम साजरे होतात. उपेक्षित महिलांचा कोणीही सन्मान करीत नाही. महिलादिन फक्त उच्चभ्रु वर्गात साजरा होतो. शहराची साफसफाई करुन स्वच्छता शहराची प्रतिमा चांगली ठेवणाऱ्या महिला आजच्या खऱ्या अर्थाने रणरागिणी आहेत. त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. शिवबा प्रतिष्ठानने या महिलांना पैठणी भेट देवून महिला दिन साजरा केला आहे, असे कराळे यांनी सांगितले.
सफाई कामगार महिलांच्या वतीने ज्योती थोरात म्हणाल्या की, आज जागितीक महिला दिन असला तरी आम्ही सफाई कामगार असल्याने उपेक्षित असतो. आमच्या कडे दुर्लक्ष केले जाते. परंतू माजी नगरसेवक अदिनाथ कराळे यांच्या शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सफाई कामगार महिलांना चांगल्या प्रतीच्या पैठणी देवून सन्मान करण्यात आला.आज कराळे खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केला आहे.असे थोरात यांनी सांगितले.
यावेळी संगिता शोजवळ, कमल बर्डे, कमल संसारे, लिलाबाई अस्वले, नंदा पंडीत, सुनिता सरोदे, सुनिता मस्के, मथुराबाई सुर्यवंशी, मिराबाई पवार, ज्योती थोरात, संगिता पंडीत, नंदा शेलार, संगिता डोंगरे, रोहीणी लाहुंडे, कविता सरोदे, अलका लाहुंडे, स्वाती शेलार, सिंधुबाई लोंढे, मिराबाई गायकवाड, शोभा ननवरे आदी महिला कर्मचारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुञसंचालन कृष्णा महांकाळ यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ कड यांनी केले.
0 टिप्पण्या