राहुरी / बाळकृष्ण भोसले - राहता तालुक्यातील आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत अध्यक्ष राजेंद्र चेचरे तर उपाध्यक्ष विजय चेचरे यांची निवडणूक बिनविरोध होऊन सर्वांच्या सहकार्याने राहता तालुक्यात इतिहास घडविला.
पद्मभूषण बाळासाहेब विखेेे पाटील यांनी घालून दिलेल्या बिनविरोध निवडणुकीचा पायंडा आजतागायत सुरू आहे. संस्थेची पाच वर्षासाठी निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या संस्थेत बिनविरोध निवडून आलेले सदस्य सर्वश्री राजेंद्र केरूनाथ चेचरे, गणेश भाऊसाहेब चेचरे, विजय हरिभाऊ चेचरे, राजेंद्र चंद्रभान चेचरे, किशोर हौशिराम दरंदले, बाबासाहेब हौशीराम चेचरे, किरण अण्णासाहेब चेचरे, कोंडीराम परसराम नेहे, महिला राखीव सौ अनिता किशोर तुरकणे, सौ पुष्पलता बाबासाहेब चेचरे, इतर मागासवर्गीय किरण रघुनाथ इनामकेे, भटक्या विमुक्त जाती लक्ष्मण नामदेव तांबे हे बारा सदस्य निवडून आले. नूतन सदस्यांची सभा निवडणूक निर्णय अधिकारी आर बी सदाफळ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वसंतराव चेचरे यांनी संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी राजेंद्र केरूनाथ चेचरे यांच्या नावाची सूचना गणेश भाऊसाहेब चेचरे यांनी मांडली, त्यास कोंडीराम परसराम नेहे यांनी अनुमोदन दिले. तसेच उपाध्यक्ष पदासाठी विजय हरिभाऊ चेचरे यांच्या नावाची सूचना राजेंद्र चंद्रभान चेचरे यांनी मांडली त्यास किरण अण्णासाहेब चेचरे यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी आर बी सदाफळ यांनी जाहीर केले. यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
लोहगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. लोहगाव मध्ये भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे दोन गट आहे. एक गट विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक केरूनाथ चेचरे यांचा तर दुसरा गट ॲड बाबासाहेब चेेचरे विखे पाटील कारखान्याचे माजी तज्ञ संचालक भाऊसाहेब चेचरे यांचा. भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील सांगतील त्या गटाला गावाची सत्ता मिळत असते. विरोधी तिसऱ्या गटाचे या गावात अस्तित्व शिल्लक नाही. त्यामुळे दोन्ही गट आमने सामने लढतात. चेचरे विरुद्ध चेचरे असा सामना या गावात होत असतो. त्यास नात्यागोत्याचे ही राजकार तितकेच महत्त्वाचे आहे. यावर्षी केरूनाथ चेचरे गटाने तरुणांना संधी देण्याचे ठरवले. त्याच प्रमाणे त्यांनी तरुण उमेदवारही दिले. दुसरा गट ॲड बाबासाहेब चेचरे व विखे कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब चेचरे यांनी ही उमेदवारी दिले. परंतु भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा आदेश फार महत्त्वाचा असतो ते ज्यां गटाला आदेश देतात तोच गट सत्तेवर येतो. भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी आदेश दिल्यानंतर विखे पाटील कारखान्याचे माजी तज्ञ संचालक भाऊसाहेब चेचरे, ॲड बाबासाहेब चेचरे यांच्या गटाने माघार घेतली. बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा केला. ॲड बाबासाहेब चेचरे व भाऊसाहेब चेचरे यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी त्यांच्या गटाचे सर्व अर्ज माघार घेऊन निवडणूक बिनविरोध केली. परंतु पुढे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय जादू फिरेल हा येणारा काळच ठरवणार आहे. राजकारणात ठरवून काहीच मिळत नसते याचा अंदाज गावच्या राजकारणात गाव पुढाऱ्यांना आला आहे. एकमेकांसमोर झुंजण्यापेक्षा मिल बाटके सत्तेचा उपभोग घ्यावा. परंतु तिसरा गट अस्तित्वात आला तर ग्रामपंचायतची निवडणूक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राजकारणातील ठरवलेली स्वप्न हे मृगजळाप्रमाणे असतात. नूतन चेअरमन व्हा चेअरमन यांचे भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे आदिंनी अभिनंदन केले आहे.
प्रसंगी भास्करराव चेचरे, बबनराव चेेचरे, ॲड बाबासाहेब चेचरे, सरपंच स्मिता भाऊसाहेब चेचरे, उपसरपंच सुरेश चेचरे, तंटामुक्तीचेेे अध्यक्ष शांताराम चेचरे, तंटामुक्त उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरे, संजय चेचरे, लहानुु चेचरे, बाबासाहेब चेचरे, गणपत चेचरे, दत्तात्रेय चेचरे, विजय दरंदले, किरण दरंदले, ॲड आशिष गिरमे, लक्ष्मण चेचरे, विजय चेचरे, अशोक चेचरे, दिलीप इनामके, किशोर तुरकणे, अनिल चेचरे, बळीराम चेचरे, बबन दरंदले, कृष्णा चेचरे, बाळासाहेब चेचरे, अरूण चेचरे, संजय चेचरे, राहुुुल चेचरे, गोरक्ष गोपाळेे, प्रभाकर चेचरेे, पांडू चेचरे, अक्षय चेचरेे, विजय चेचरेे, भाऊसाहेब चेचरेे, अण्णासाहेब चेचरेे, धीरज चेचरेे, विजय दरंदलेे, विनायक दरंदलेे, रंजीत इनामके, बाळासाहेब वांगे, सोपान चेचरे, सोपान वांगे, नारायण चेचरे, अशोक चेचरे, विनायक दरंदले, रावसाहेब चेचरेे, सतीश गिरमेे, दरंदले शिवाजी, ज्ञानदेव दरंदलेे, अण्णासाहेब चेचरे यांनी नवनिर्वचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या