पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील जड वाहने बिडकीन बाहेरून वळवा


◾भीम गर्जना सामाजिक संघटनेची मागणी

◾राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना निर्देशक यांना निवेदन

विलास लाटे/पैठण : दहेगाव बंगला ते बिडकीन व कचनेर ते बिडकीन बायपासमुळे पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील बिडकीनसह पैठण औरंगाबाद रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीसह, अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून यासंदर्भात भीम गर्जना सामाजिक संघटनेने राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना औरंगाबाद येथील कार्यालयास नुकतेच निवेदन देवून सदर अवजड वाहतूक बिडकीन बाहेरुन वळविण्यात यावी अशी मागणी केली आहे.

डिएमआयसी औद्योगिक वसाहतीमुळे बिडकीनला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून याबरोबरच बिडकीन हे मोठ्या बाजारपेठेबरोबर मोठ्या लोकसंख्येचे शहर म्हणून पुढे येत आहे. पैठण-औरंगाबाद या महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या बिडकीन शहरातुन डिएमआयसी या औद्योगिाक वसाहतीमधुन बिडकीन ते दहेगाव बंगला पर्यंत बायपास मार्ग झाल्याने हैद्राबाद, नांदेड, नागपुरमधुन सर्व जड वाहतुक नगर हायवेकडे वळवण्यात आल्याने व बिडकीन पैठण रस्ता दोन पदरी असल्याने या रस्त्यावर वर्दळ वाढल्याने सतत अपघाताची मालीका सुरुच आहे. आजपर्यंत अनेक बळी या रस्त्याने घेतले आहे. 

या रस्त्यावर बिडकीन, लोहगाव, शेकटा रस्त्यावर औरंगाबाद कडुन पैठण कडे जाणारी वाहने तसेच कचनेर, निलजगाव कडुन बिडकीन कडे येणारे वाहने गतिरोधक नसल्याने बेधडक धावत असल्याने अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. हि बाब लक्षात घेऊन भीम गर्जना सामाजिक संघटनेने पुढाकार घेत, या मार्गावरील जड वाहतूक बिडकीन बाहेरुन वळविण्यात यावी यासंदर्भात राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना औरंगाबाद कार्यालय येथील अरविंद काळे, सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद व बिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना निवेदन दिले. या निवेदनाची त्वरीत दखल घेऊन अवजड वाहतुक दहा दिवसांत बिडकीन बाहेरुन वळविण्यात यावी व त्यांना नियमावली तसेच बिडकीन बसस्थानकावर पोलीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी नेमणूक करण्यात यावी. नसता भिम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने बिडकीन औरंगाबाद पैठण रस्त्यावर रास्ता रोको करुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर महाराष्ट्र उपाध्यक्ष के.ए.काझी, मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख इलियास शेख, पैठण तालुका कार्याध्यक्ष शेख राजू, तालुकाध्यक्ष अर्शद शेख, सोशल मिडिया अध्यक्ष फेरोज मिर्झा, कृष्णा लोखंडे, उमेर बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या