राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे, महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. चारुदत्त चौधरी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. मनोज गुड, प्रा. कीर्ती भांगरे, अधिदान व लेखा अधिकारी सूर्यकांत शेजवळ उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, नाट्यछटा, वैयक्तिक नृत्य, शास्त्रीय नृत्य, गायन व वादन असे विविध प्रकारांमधून आपल्या कला आविष्कारांनी रंग भरले. महाविद्यालयाचे हे पहिलेच स्नेहसंमेलन होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजली देशपांडे, संग्रामसिंह नानासाहेब पायघन, अक्षता अन्नदाते, सुषमा माने व रोहिणी मोहोळकर यांनी तर आभार प्रदर्शन निशांत इंगोले यांनी केले. यावेळी सादर झालेल्या विविध कलाविष्कारसाठी परीक्षक म्हणून साजन हिंगोणेकर, पद्म कुमार पाटील या आचार्य पदवी च्या संशोधनार्थिनी तसेच सोनई येथील कृषी महाविद्यालयाचे डॉ. संतोष चौगुले यांनी काम पाहिले.
विद्यार्थी परिषदेचे सभापती कु मयुरी गुंजाळ, सचिव कु वैष्णवी कासार व इतर सर्व सदस्य तसेच, सहाय्यक कुलसचिव एकनाथ बांगर, अनिल शेळके, सौ. वैशाली पोंदे, सौ. ज्योती सासवडे, अमृता सोनवणे, विशाल भोसले, महेश सुरवसे, सौ. विद्या पुजारी व महाविद्यालयाचे तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
0 टिप्पण्या