विलासस लाटे/पैठण
: तालुक्यातील बोकुड जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत नुकत्याच झालेल्या पालक सभेत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब पाटील तरमळे यांची तर उपाध्यक्षपदी संतोष बर्फे सचिव पदी मुख्याध्यापक उमेश मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

तसेच ज्ञानेश्वर नागे, प्रियंका बळीराम नागे, दादासाहेब नागे, राजू नागे, पूजा खरात, सुनीता खरात, सुनील खरात, सुनीता आवारे, अर्जुन नरवडे, शारदा गारपगारे, विद्या सोनार, अनिता छडीदार, सुरेखा छडिदार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते सोबतच शाळेचा परीसर यासह इमारत आदी भौतिक सुखसुविधेविषयी गांभीर्याने लक्ष देवून बोकुड जळगाव जिल्हापरीषद शाळेला उत्तम दर्जा प्राप्त करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करील, अशी भावना नवनिर्वाचीत अध्यक्ष तरमळे यांनी यावेळी व्यक्त केली.

या निवडबद्दल सरपंच रामेश्वर लोखंडे, पांडुरंग नागे, बळीराम नागे, श्रीकांत तरमळे, वैजीनाथ गारपगारे, श्री.बनकर, श्रीमती पारवे, श्रीमती शिंदे, पांडुरंग राऊत, रमेश खरात, कृष्णा नागे, बाळू सोनवणे, सुनील आवारे, रुस्तुम नागे, अरुण नागे आदींसह पालकांनी अभिनंदन केले.