सातारा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.सुभाष वाघमारे यांच्या‘संविधांनाच्या स्वप्नातलं गाव’या कवितासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने १४ मार्च २०२२ रोजी वामनदादा कर्डक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त येत्या २७ मार्च दिवसी दीक्षाभूमी सभागृहात त्यांना पुरस्कार देऊन त्यांचासह ५० राष्ट्रीय व १०० राज्यस्तरीय पुरस्कार मानकरी यांचा सन्मान केला जाणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी भदंत नागार्जुन सुरई ससाई, राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत, मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेवटीवार, मेंदुरोग तद्न्य डॉ.चंद्रशेखर मेश्राम, वनराईचे अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ.दीपककुमार खोब्रागडे यांनी दिली.
त्यांच्या या यशाबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर, शिवाजी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, ऑडीटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये, उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे, उपप्राचार्य डॉ.रोशनआरा शेख, उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख, शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.रणधीर शिंदे, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश दुकळे, शिविमचे माजी अध्यक्ष डॉ.शिवकुमार सोनाळकर यांनी अभिनंदन केले.
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे हे मुळचे मळोली, ता.माळशिरस, जिल्हा सोलापूर या गावचे रहिवासी असून त्यांचे शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झाले. त्यांनी गावी समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सेवाभावी कार्यात योगदान दिले. ३१ वर्षे रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी विवेक वाहिनी सारख्या विधायक कार्य करणाऱ्या विकास उपक्रमात मोठे कार्य केले आहे. अलीकडे 5 जून २०२१ रोजी त्यांच्या संविधानाच्या स्वप्नातलं गाव या कवितासंग्रहाचे प्रकाशन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते झाले होते. या कविता संग्रहास वाचन संस्कृती प्रतिष्ठान चा राज्यस्तरीय समाज प्रबोधन पुरस्कार, छत्रपती शिवाजी कॉलेजचा सर्जनशील साहित्य लेखन पुरस्कार, तसेच गारगोटी येथील न्यूज पेपर गंगाधर पुरस्कार तसेच तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार, शब्दकळा साहित्य संघ मंगळवेढा यांचा काव्य पुरस्कार, श्रीरामपूर येथील प्रकाश किरण पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा ललित साहित्य पुरस्कार, फलटण येथील उत्कृष्ट साहित्यसेवा पुरस्कार असे आठ पुरस्कार मिळाले असून सृष्टी साहित्य पुरस्कार अकोला हा नववा व हा वामनदादा कर्डक पुरस्कार दहावा जाहीर झाला आहे.
साहित्यविश्व प्रकाशनचे प्रकाशक विक्रम शिंदे, डॉ.संजयकुमार सरगडे, तारुण्यवेध संघटनेचे विशाल पोखरकर, छत्रपती शिवाजी कॉलेजचा स्टाफ, समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते, भीमराव मोरे, तुकाराम लोखंडे, शिवाजी वाघमारे, डॉ.गोरख बनसोडे, फर्गुसन कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.प्रकाश पवार, भिनवाडा कादंबरीचे लेखक बाळासाहेब कांबळे, प्रा.युवराज खरात, तुषार बोकेफोडे, रोहित आवळे, प्रा.डॉ.आर.ए.कुंभार सम्यक शाक्य रत्न, मळोली गावातील हितचिंतक ग्रामस्थ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते, लुंबिनी संघ सातारा, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर, शिक्षक हितकारणी संघटना पुणे, तसेच अनेक साहित्यिक इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या