जर्मनीतील दूतावासाशी राज्यातील विद्यार्थी साधणार संवाद ; २३ मार्च रोजी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा

सकाळ माध्यम समूह, जर्मन दूतावास व महाराष्ट्र मंडळ म्युनिक यांचा संयुक्त उपक्रम

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साधला थेट जर्मनीच्या दूतावासाशी संवाद... शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचेही मार्गदर्शन लाभले.

अहमदनगर/ जावेद शेख : देशभर साजरा करण्यात येत असलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, राज्यातील शाळांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शनपर 'ग्लोबल महाराष्ट्र' हा उपक्रम सकाळ माध्यम समूह, जर्मनीतील भारतीय वाणिज्य दूतावास येथे कार्यरत असलेले मराठी अधिकारी डॉ. सुयश यशवंतराव चव्हाण व महाराष्ट्र मंडळ - म्युनिक यांच्या संयुक्त प्रयत्नाने ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील ४०० पेक्षा अधिक शाळा व हजारो विद्यार्थी जोडले गेले.
     सोहम सचिन पोंदे ( 7 वी ), अलिषा शौकत पठाण ( 7 वी ), दिव्या सिताराम आढाव ( 8 वी ), सार्थक बाळासाहेब सूळ ( 8 वी ), बेरड अथर्व संतोष ( 9 वी), अध्वर्या अधीर आहेर ( 9 वी) आणि तुकाराम जाधव सर‌ यांनी सहभाग नोंदविला.
याच उपक्रमातील दुसऱ्या टप्प्यातील मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन दि. २३ मार्च २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी करण्यात येत आहे. या कार्यशाळेसाठी राज्यातील १००० (एक हजार) शाळांमधील इयत्ता सातवी, आठवी व नववीतील शालेय विद्यार्थी जर्मनीतील भारतीय वाणिज्य दूतावसाशी संवाद साधणार आहेत. म्युनिक शहरातील दूतावासाशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हे ऑनलाईन मार्गदर्शनपर संवाद सत्र होईल.

या कार्यशाळेसाठी राज्याच्या दुर्गम भागातील, ग्रामीण शासकीय शाळांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कार्यशाळेत शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शाळेतील एका शिक्षकाला सहभागी होता येणार आहे, यासाठी राज्यभरात विद्यार्थी  व शिक्षकांचा एक संघ तयार करण्यात आला असून, शाळांची नाव नोंदणी सुरू झाली आहे. शाळांनी सोमवार ता.(२२) मार्च २०२२ पूर्वी devandhale89@gmail.com या इमेल आयडीवर शाळेचे नाव, पत्ता, सहभागी शिक्षकाचे नाव व मोबाईल क्रमांक अशी माहिती पाठवावी. 

कार्यशाळेत सहभागासाठी कार्यपध्दती
१. मार्गदर्शनपर कार्यशाळेसाठी सातवी, आठवी व नववीचे शालेय विद्यार्थी व शाळानिहाय विद्यार्थ्यांसोबत एक प्रभारी शिक्षक उपस्थित राहतील. 

२. शक्यतो प्रत्येक शाळेतील मुलांची आणि मुलींची संख्या समान असावी. 

उपक्रमाचा उद्देश :-
१ . शालेय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील विविध संधी आणि भविष्यातील आव्हाने यासाठी शालेय जीवनापासून मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.

२. जर्मनीतील शैक्षणिक आणि करिअर विषयक संधी बाबत माहिती देणे व विद्यार्थ्यांना जागरूक करणे.

३. जर्मन भाषा या विषयात उपलब्ध असणाऱ्या विविध संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे.

      महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरजू  विदयार्थ्यांना परदेशातील शिक्षणाच्या संधींची योग्य माहिती मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असून, या पुढील काळात सकाळ मध्यम समूह इतर देशांसोबतही असा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहील. 
_ महेंद पिसाळ; मुख्य कार्यपालन अधिकारी, सकाळ माध्यम समूह.

       'ग्लोबल महाराष्ट्र' या उपक्रमात आजपर्यंत महाराष्ट्रातील ४०० पेक्षा अधिक शाळा सहभागी झाल्या. याचा आनंद आहे. मार्गदर्शनपर कार्यशाळेच्या दुसऱ्या टप्प्यातील संवाद व मार्गदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील इतर शाळांमधील शिक्षकांनी पुढाकार घ्यावा.
डॉ. सुयश यशवंतराव चव्हाण, जर्मनीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील मराठी अधिकारी. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या