प्रा. संगीताताई गायकवाड-भांड यांना आयडॉल लेडी पुरस्कार

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : सह्याद्री मल्टीस्टेट फायनान्स लिमिटेडच्या माहेर ग्रुपच्या वतीने देवळाली प्रवरा येथिल रहिवाशी व राहुरी फँक्टरी येथिल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षिका प्रा. संगीताताई गायकवाड-भांड यांना जागतिक महिला दिनानिमित्त 'आयडॉल लेडी पुरस्कार 2022' मिळाल्याबद्दल विविध स्थरातुन अभिनंदन केले जात आहे.

माहेर ग्रुपच्या प्रमुख शुभांगीताई थोरात, सह्याद्री मल्टीस्टेट फायनान्स लिमिटेडचे चेअरमन संदीपजी थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर येथील माऊली सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त 'आयडॉल लेडी पुरस्कार 2022' प्रदान करण्यात आले. यावेळी  जिल्हा न्यायाधीश रेवतीताई देशमुख, तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, शितलताई जगताप, डॉ. वैशाली किरण, डॉ. धूत, डॉ. सुप्रिया वीर, कांचन  बिडवे, ॲड अनुराधाताई येवले, प्रीती सागवान आदींच्या उपस्थित प्राध्यापिका  संगीताताई गायकवाड-भांड यांना जागतिक महिला दिनानिमित्त 'आयडॉल लेडी पुरस्कार 2022' प्रदान करण्यात आला.

प्राध्यापिका संगीताताई गायकवाड-भांड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, व्हा.चेअरमन दत्तात्रय ढुस, माजी व्हा.चेअरमन शामराव निमसे, बाळकृष्ण बानकर, कृषी उत्पन्न बाजार संचालक व राहुरी पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, टाकळीमिया येथिल संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य डी.आर. म्हसे, राहुरी फँक्टरी येथिल छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन.आर. जाधव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

पुरस्कार प्राप्त प्रा. संगीताताई गायकवाड-भांड या देवळाली प्रवरा येथिल श्री.छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. गणेश भांड यांच्या पत्नी तर देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन सोपानराव भांड यांच्या स्नुषा आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या