राहुरी विद्यापीठ : सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथे नुकताच अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला विद्यालयातील इ.पाचवी ते इ.नववी या वर्गातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सुमारे 285 विद्यार्थ्यांनी प्रयोग/ उपकरणे मांडले होते. परिसरातील सहज उपलब्ध होणारे साहित्य जसे फुगा, रिकामी बाटली, दोरा, स्ट्रॉ, बॅटरी, सोलर सेल अशा साहित्याद्वारे विज्ञानातील अनेक संकल्पना स्पष्ट होण्याकरिता विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या प्रयोगाचे सादरीकरण केले. या प्रयोगाद्वारे हवेचा दाब, न्यूटनचे नियम, बर्नोल्ली तत्व, गुरुत्वाकर्षण, संवेग अक्षय्यतेचा नियम अशा अनेक नियमांची पडताळणी करत इतर विद्यार्थ्यांनाही अनुभूती देत होते. तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित काही नाविन्यपूर्ण उपकरणे मांडले होते.
या मेळाव्याला विद्यालयातील सुमारे 1600 विद्यार्थ्यांनी भेट दिली. अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन विज्ञान शिक्षक अरुण तुपविहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, मुख्याध्यापिका श्रीमती आशा धनवटे, उपमुख्याध्यापक नंदकुमार मुळे, पर्यवेक्षक श्री.विसपुते, क्रीडाशिक्षक शमशुद्दीन इनामदार, प्रा.जितेंद्र मेटकर, प्रा.मेहरे सर यांनी केले.
अपूर्व मेळावा यशस्वी होण्याकरीता एनसीसी ऑफिसर संतोष जाधव, तसेच विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक रविंद्र हिवाळे, श्रीमती सुरेखा आढाव, हलीम शेख, तुकाराम जाधव, सचिन सिन्नरकर, बाळासाहेब डोंगरे, घनश्याम सानप, दशरथ दळवी आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या