ऊसतोड कामगार कुटुंबांना कपडे वाटप; आशाये व क्रांतिदिप सामाजिक संस्थेचा उपक्रम

अहमदनगर/ जावेद शेख : "रंगात रंग मिसळले की, रंगाच्या नव्या छटा निर्माण होतात. माणसांनी माणसात मिसळले की नवीन नाती निर्माण होतात". या उक्तीप्रमाणे आज दि. १८ मार्च २०२२ रोजी निळवंडे येथे ऊसतोड कामगारांची कुटुंब व धरणावर काम करणाऱ्या परप्रांतीय कुटूंबाना "आशाये सामाजिक संस्था व क्रांतिदिप बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत ३५ कुटूंबांना ब्लॅंकेट व कपड्याचे वाटप करण्यात आले.

होळी सणाच्या निमित्ताने गरीब, गरजू, कष्टकरी मजुरांच्या कुटूंबाना अशा प्रकारचे साहित्य वाटपाचा उपक्रम समाजाला प्रेरणादायी व दिशा देणारा आहे .हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अकोले तालुका पशुवैद्यकीय अधिकारी श्री.डॉ.अशोक धिंदळे, डॉ.डी. डी. भोर, निळवंडे शाळेचे शिक्षक तपासे काळू रामचंद्र व मुकुंदा आभळे यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या