राहुरी / बाळकृष्ण भोसले - तालुक्यातील वळण येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळेत ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने "स्त्री शक्तीचा जागर"कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हिरकणींचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील सर्व महिला शिक्षक-शिक्षकेत्तर वृंदांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या वळणच्या तलाठी कविता गडदे यांनी स्त्री ही एक शक्ती असुन तिचा सन्मान आपण फक्त आजच्याच दिवशी नाहीतर दररोज केला पाहीजे, तसेच विद्यार्थींनीनी उद्याची सक्षम महिला होण्यासाठी आजच भरपुर अभ्यास करून विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करून एक पाऊल पुढे असले पाहिजे असे सांगुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर दुस-या प्रमुख वक्त्या वैद्यकीय अधिकारी अंजुमन शेख ज्ञानज्योती सवित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचुन त्यांनी स्त्रीयांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला असे सांगुन सवित्रीबाईंचा आपण आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाची सुरूवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा वळणच्या उपसरपंच लीलाताई गोसावी व प्रमुख पाहुणे मा. सरपंच आशाताई खुळे यांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांना पुष्पहार घालुन करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थीनीनी महिला सक्षमीकरण, स्त्री भ्रणहत्या, स्त्री शक्ती, महिला जागर इ.विषयावर भाषणे, स्वरचित कविता व विविध गाणे म्हणून सादरीकरण केले.
या प्रसंगी अध्यक्ष लीलाताई गोसावी, प्रमुख पाहुण्या आशाताई खुळे, माध्यमिक मुख्याध्यापक मंगेश पगारे, प्राथमिक मुख्याध्यापक मच्छिंद्र गायकर, श्री सय्यद साहेब इ.नी यथोचित मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेतील विद्यार्थीनी कु.ऋतुजा भोगे व कु.समिक्षा डमाळे तर प्रास्तविक कु.प्रियंका मकासरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिक्षक, अधिक्षीका, शिक्षक, शिक्षकेत्तर वृदांनी प्रयत्न केले.
0 टिप्पण्या