कृषी विद्यापीठ गेटसमोरील उपोषणकर्ते प्रकल्पग्रस्तांना शिवसेनेचे पै. खेवरे, प्रहारचे लांबे यांची भेट

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना आज शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख पै. रावसाहेब खेवरे यांनी भेट दिली व पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न सुरु आहेत अशी ग्वाहीच एक प्रकारे दिली. दुपारी प्रहार पक्षाचे सुरेशराव लांबे पाटील यांनी ही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना होऊन पन्नास वर्षे पूर्ण झाली. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले. जमिनीचे संपादन करतेवेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कुटुंबातील एका वारसास शासकीय नोकरी देण्याची तरतूद होती. परंतु आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी वेळोवेळी शासन दरबारी व विद्यापीठ प्रशासनाकडे आपली मागणी मांडत आहे. तरीदेखील त्यावर कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भावना अत्यंत तीव्र झाल्याने प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी उर्वरित सर्व प्रकल्पग्रस्त दिनांक १४ मार्च पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारा बाहेर बेमुदत आमरण उपोषण करत आहेत.
यावेळी प्रहार पक्षानेही विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाठिंबा दिला असुन न्याय न मिळाल्यास तिव्र लढा उभारला जाईल, असा इशारा तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या