पेन्शनवाढीचा प्रश्न निश्चित मार्गी लावणार- खा. डॉ. सुजय विखे पा

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) - ई.पी.एस.९५ पेन्शनर बचाव संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर व जिल्हाध्यक्ष संपत समिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२४ मार्च ते ७ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील सर्व लोकसभा खासदार व मंत्री यांना निवेदन देण्याचा व या चालू अधिवेशनामध्ये पेन्शन धारकांचा प्रश्न सर्वानुमते सोडविण्याचा आग्रह धरण्यात आला. त्यानुसार आज रविवार दि.२७ मार्च २०२२ रोजी ईपीएस ९५ संघटनेचे नगर शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय मुनोत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विळद घाट इंजिनिअरिंग कॉलेज येथे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना निवेदन देऊन प्रश्न सोडविण्याची विनंती करण्यात आली.

त्यावेळेस खासदार साहेबांनी कुठल्याही परिस्थितीत तुमचा पेन्शनरचा मुद्दा मी लोकसभेत मांडीन असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळात नगर अध्यक्ष संजय मुनोत, बबनराव बारहाते, बबनराव शिंदे, महादेव कुलकर्णी, सुभाषराव तापकीर, शिरीष जानवे, यशवंत फुलसौन्दर, राजहंससाहेब, सय्यद मोहीदीन, रमेश बहीरवाडे, उत्तम सराफ, किसन विधाते, विठ्ठल देवकर व असंख्य पेन्शनर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या