२ व ३ एप्रिल रोजी हरिगाव येथे आध्यत्मिक तपाचे आयोजन

श्रीरामपूर[ बाबासाहेब चेडे ] : संत तेरेजा चर्च हरिगाव यांच्या वतीने २ मार्च ते १३ एप्रिल पर्यंत हरिगाव धर्मग्रामातील क्रुसाच्या वाटेच्या दर बुधवारी/ शुक्रवारी भक्तीचे नियोजन करण्यात आले आहे.

त्याप्रमाणे दि १, ६, ८ व १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता भक्ती होईल. गुरवारी ३१ मार्च रोजी प्रजा जागृती शिक्षण मंडळ [पीजेएस] वतीने हरिगाव टिळकनगर, राहाता, कोळपेवाडी आदी ठिकाणाहून सर्व शिक्षक आदी आज झालेल्या अध्यात्मिक तपामध्ये सहभागी होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी रे फा ज्यो गायकवाड होते. तसेच स्थानिक धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ, रिचर्ड, सचिन मुन्तोडे सहभागी होते.

दि. २ एप्रिल व ३ एप्रिल रोजी हरिगाव धर्मग्रामाच्या वतीने सकाळी ९ वाजता अध्यात्मिक तपाचा [ परमेश्वरच्या सानिध्यात ] कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचा लाभ घ्यावा. त्याप्रसंगी रे फा संतोष साळवे [मुंबई] यांचे प्रवचन होणार आहे. प्रायश्चित्तकाळ हा कृपेचा व नुतनीकरणाचा काळ आहे. या काळात प्रार्थना, उपवास, व दानधर्म करतात. हरिगाव संत तेरेजा चर्च प्रांगणात प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणाची [शुभारंभ] भाविक प्रतीक्षा करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या