श्रीरामपूर (प्रतिनिधी ) : मालुंजे बु, ता.श्रीरामपूर येथील प्रगतिशील शेतकरी व जेष्ठ कार्यकर्ते पुरुषोत्तम उर्फ सुभाषराव दौलतराव बडाख वय 71 यांचे शनिवार दि. १९ मार्च रोजी रात्री ९ वा. हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखत निधन झाले. त्यामुळे मालुंजे व पंचक्रोशीत दुःखाची छाया पसरली आहे.
त्यांचे पश्चात पत्नी सुनंदा, दोन मुले अजित, सचिन, एक मुलगी सुप्रिया, सुना, जावई, नातवंडे, दोन भाऊ, पाच बहिणी असा मोठा परिवार आहे. राज्य सहकारी बँकेचे अधिकारी शंकरराव बडाख यांचे जेष्ठ बंधू आणि पेन्शनर संघटनेचे पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांचे मेहुणे होते.
0 टिप्पण्या