राहुरी / बाळकृष्ण भोसले - पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पा. ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहाता तालुक्यातील कोल्हार येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख सतीश आशिनाथ गोंडे यांना अर्थशास्त्र या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
'अहमदनगर जिल्ह्यातील भटक्या जमातींचे आर्थिक व सामाजिक अध्ययन' या विषयावर प्रोफेसर (डॉ) रामचंद्र रसाळ, अध्यक्ष, व्यवसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले आहे. डॉ. पी. एम. दिघे, डॉ. महेश खर्डे , डॉ. एच. आर. आहेर, डॉ. सुहास आव्हाड, डॉ. संभाजी काळे आदींचे अनमोल मार्गदर्शन त्यांना लाभले.
संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, खासदार डॉ. सुजय विखे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंगोटे, कॅम्पस डायरेक्टर डॉ. श्रीमती सिनगर, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत रुद्राक्ष तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच कालभैरवनाथ तरुण मित्र मंडळ,जोशी वस्ती, अखिल भारतीय भटका जोशी सेवा संघटना, महाराष्ट्र राज्य आणि जगदंब मित्रमंडळ, अशोकनगर फाटा यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या