अहमदनगर/ जावेद शेख : भारतीय स्वातंत्र अमृत महोत्सवानिमित्त युवक बिरादरी भारत व श्रीरामपूर जिल्हा शाखेच्या वतीने खा. गोविंदराव आदिक सभागृहात आयोजित एक सुर एक ताल या नृत्य गायनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला, कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे व डॉ.प्रमोद काळे यांनी केले. अध्यक्ष स्थानी के. के. आव्हाड होते, प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक रमेश लोढा, अनिल चोरडिया, कल्याण कुंकुलोळ, सलीमखान पठाण, प्राचार्य ज्वाला कांबळे, चंद्रकांत परदेशी, सुनील शेळके, सोमनाथ परदेशी, प्रमोद पत्की आदी मान्यवर उपस्थित होते.
डी. डी. काचोळे विद्यालय श्रीरामपूर, न्यू इंग्लिश स्कूल पुणतांबा, महात्मा गांधी विद्यालय मुले व मुलींची शाळा प्रवरानगर, मॉडेल इंग्लिश स्कूल, सेंट झेवियर इंग्लिश मिडीयम,डहाणूकर इंग्लिश स्कूल टिळकनगर, परमवीर शहीद अब्दुल हमीद प्राथमिक शाळा, प्राथमिक विद्यामंदिर, सी. डी.जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, आर. बी एन. बी. कॉलेज ऑफ श्रीरामपूर, भि. रा.खटोड कन्या विद्यालय श्रीरामपूर आदी शाळा कॉलेजची प्रशिक्षणासाठी निवड केली होती. या सर्व मुलांना नृत्य गायनाचे प्रात्यक्षिक दाखवून कृती करून घेताना विद्यार्थी उल्हासित दिसत होते. त्यांचा चेहऱ्यावरील भाव स्वर्गीय सुखाचा आनंद देत होती अक्षय ऊर्जा, जल ही जीवन है, जातीभेद निर्मूलन, निसर्ग महत्त्व, सामाजिक समतेचा संदेश देणारी कव्वाली, हा नाश थांबवा वसुंधराचा, यासारखी प्रबोधनात्मक गीते, हिंदी, मराठी, बंगाली, पंजाबी, गुजराती या भाषेतून एकाचवेळी ५०० विद्यार्थ्यांनी सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
श्रीरामपूर मध्ये एकाचवेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र करून नियोजन व अतिशय शिस्तबद्ध प्रशिक्षण झाल्यामुळे नागरिकांनी संयोजकांना धन्यवाद दिले, रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. श्रीरामपूरचे सांस्कृतिक चळवळीत भर टाकणारा हा कार्यक्रम ठरला उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे यांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करून देश व समाज बांधणीसाठी व त्यातून आदर्श नागरिक बनवण्यासाठी युवक बिरदरीचे प्रयत्न भविष्यात यशस्वी होतील हे सांगतानाच त्यांनी मुलांमध्ये राष्ट्र भक्ती व एकात्मतेसाठी असे प्रशिक्षण नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा व्यक्त केली. अध्यक्ष के. के. आव्हाड यांनी मुलांना स्वर्गीय आनंदच मिळाल्याचे सांगून त्यांच्या उस्तहाचे कौतुक केले.
समन्वयक सुनील साळवे यांनी बोलताना सांगितले पुढील वर्षी हा कार्यक्रम जानेवारी महिन्यात खुला ठेवला जाईल सर्व शाळा कॉलेज यांचा सहभाग घेतला जाऊन ३ दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल असे त्यांनी सांगितले. प्रकल्प संचालक प्रशांत वाघाय यांनी श्रीरामपूर युवक बिरादरी शाखेने आयोजित केलेला कार्यक्रम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये झालेल्या कार्यक्रमात अव्वल ठरला असून येथील सुविधा, विद्यार्थी शिक्षक उस्ताह, नियोजन अतिशय प्रभावी असल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले, आभार प्रा.पोपटराव शेळके यांनी तर सूत्रसंचालन नागेंद्र रॉय यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सुनील साळवे, के.के.आव्हाड, प्रा.डॉ.शैलेंद्र भणगे, संतोष जाधव, सागर जावळे, प्रवीण साळवे, पोपटराव शेळके, भरत कुंकुलोळ, विनीत कुंकुलोळ, अरुण कतारे, दिलीप महाजनी, सागर गिरनारे, सुरेश वाघुले, प्रकाश जाधव, लहानु त्रिभुवन, साहेबराव रकटे, सुखदेव शेरे, लता शेळके, प्रा. सुप्रिया साळवे, शोभा शेंडगे, सविता साळुंके, पुष्पा शिंदे, वैष्णवी वाडकर, युवा बिरादरी टीम आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या