छ.शिवाजी महाराजांच्या जंयतीचे औचित्य साधून शिवजन्मोत्सव विचार क्रांती या अनोख्या पुस्तकदान उपक्रमातुन जिल्ह्यातुन महिनाभर विविध ठिकाणी जाऊन लोकसहभागाद्वारे आव्हान करून विविध साहित्याचे, स्पर्धा परीक्षेचे पुस्तक जमा करून त्या माध्यमातून एक समाज उपयोगी वाचनालय उभारणी युवांशने करून ग्रामीण भागात एक आर्दश उभा केला आहे.
या वाचनालयाच्या लोकापर्णाच्या कार्यक्रमासाठी बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने, साईसाधना आश्रमाचे स्वामी बलदेव महाराज, धुपखेडचे सरपंच कैलास वाघचौरे, संतोष भुकेले तसेच युवांशचे किशोर चाटूपळे, पुजा नरवडे, शुभम शेळके, आनंद सातकर, आश्विनी इंगळे, मनोहर इनामे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सचिन आहिरे, युथ फाउंडेशनचे ज्ञानेश्वर कोलते, अशोक जगदाळे, रोहित कुलकर्णी तसेच ग्रामपंचायत धुपखेडा व साई अभ्यासिका यांचे विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश छबीलवाड यांनी तर आभार विलास वाघचौरे यांनी मानले.
ग्रामीण भागातील तरुणाईने स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन केले पाहिजे
आयुष्यात केवळ स्वतःला ओळखून मेहनत व कष्टाच्या जोरावरच यश मिळवता येते. त्यामुळे स्वतःच्या क्षमता ओळखून वेगवेगळ्या क्षेत्रात तरुणाईने जायला हवं. यासाठी युवांश भविष्यात फार मोठा वाटा उचलून ग्रामीण भागातील तरुणाईला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही. असे त्यांनी कार्यक्रमादरम्यान बोलतांना सांगितले.
-संतोष माने, सपोनि बिडकीन पोलिस ठाणे
0 टिप्पण्या