श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : शिक्षण ऑनलाइन व ऑफलाईन या विषयावर अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारी वस्तीच्या उपाध्यापिका वर्षा गायकवाड यांच्या लेखणीतून साकारलेली वास्तविकता सध्याच्या समाज जीवनावर भाष्य करणारे आहे.
निबंध स्पर्धा म्हणजे समाज मनाचे लिखीत प्रतिबिंब मानावे लागेल. सध्या सोशल मीडिया मुळे हस्त लिखीत विचाराची मांडणी करणारे हस्त व मस्तक लोप पावत चालली आहे. वाचन व लिखाण संस्कृती वृध्दिंगत होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन निबंध स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ.उषा मुंदडा यांनी केले.
राजस्थानी महिला मंडळ श्रीरामपूर च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारी वस्ती येथील उपाध्यापिका वर्षा गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. कार्यक्रम प्रसंगी डाँ.अर्चना सोमाणी, प्रा.भाग्यश्री बढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वर्षा गायकवाड मॅडम यांचे पुजारी वस्ती शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष दिपक राव गाढे व सभासद, अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, आसान दिव्यांग संघटना महिला प्रदेशाध्यक्षा सौ.स्नेहा कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष कु.सुनिता जंजिरे, डाँ.हेलन केलर दिव्यांग बचत गट अध्यक्षा प्रेरणा ठाणगे, खजिनदार सौ.साधना चुडीवाल, सौ.अलका काळे, कु.जया अमोलिक यांनी विशेष अभिनंदन केले
0 टिप्पण्या