बिडकीन (ता.पैठण) येथील स.भु. प्रशालेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काढलेली लक्षवेधक ग्रंथदिंडी. |
यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे वैभव दर्शवणारे व महती सांगणारे " हि मायभूमी" हे गीत अतिशय सुरेल आवाजात सादर केले. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून अतिशय आगळीवेगळी ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. या ग्रंथदिंडीला शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, माजी मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, बाबासाहेब सोकटकर यांनी श्रीफळ फोडून उत्साहात सुरुवात झाली.
यावेळी विद्यार्थीनींनी नववारी साडी तर विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा पोषाख परिधान करून "चल ग सखे..चल ग सखे.. पंढरीला चल " या गीतावर अतिशय चित्ताकर्षक पावली खेळली. या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे आयोजन मराठी भाषेचे शिक्षक मंगला गायधने, विलास सोनजे, मच्छिंद्र पाटील, वैशाली लोंढे, अनुराधा मिरजकर, अनिल साबळे यांनी केले होते.शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पावलीचे तोंडभरून कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला गायधने यांनी तर आभार वैशाली लोंढे यांनी मानले.
0 टिप्पण्या