उंदीरगाव येथून ३ बसेस नर्मदा परिक्रमासाठी रवाना- सुरेश गलांडे

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : नर्मदा परिक्रमा म्हणजे अनेक नद्यांपैकी फक्त नर्मदा नदीची परिक्रमा होते त्याला फार महत्व आहे. गंगा नदीचे पाच स्नान करा पण नर्मदा नदीचे एकच स्नान पवित्र असते व आपल्याला पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. आज उंदीरगाव व पंचक्रोशीतील १८० यात्रेकरू ३ बसेस मधुन नर्मदा परिक्रमासाठी निघाले आहेत.

ही नर्मदा परिक्रमा यात्रा १५ दिवसांची, उन्दिरगाव, ओंकारेश्वर, प्रकाशा, कटपोर, निलकंठेश्वर, गरुडेश्वर, कुबेर, महेश्वर, नेमावर, भेंडाघाट, अमरकंटक, महाराजापूर, होशंगाबाद असा प्रवास आहे. ना नफा ना तोटा अशा धर्तीवर आयोजन केले आहे. अशा भारतात २० यात्रा केल्या आहेत, असे प्रतिपादन आयोजक माजी चेअरमन सुरेश पा.गलांडे यांनी उंदीरगाव येथे केले.

या सर्व यात्रेकरूना भूमी फौंडेशन म.राज्य यांच्या वतीने आरोग्यमित्र भीमराज बागुल, पत्रकार बी आर चेडे, तसेच सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, रेवजी भालदंड, वीरेश गलांडे, राजेंद्र पाउलबुद्धे, शिवाजी पाउलबुद्धे, राजीव गीऱ्हे, अमोल नाईक, बाबासाहेब नाईक, विजय ताके, राजेंद्र गुंड, प्रकाश ताके आदी ग्रामस्थांनी आयोजक सुरेश गलांडे व यात्रेकरूना शुभेच्छा दिल्या. तसेच अशोकनगर पेट्रोल पंप येथे माजी आमदार व चेअरमन भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, सोपानराव राउत, रामभाऊ कासार, सर्व संचालक, ग्रामस्थ यांनी नर्मदा परिक्रमा आयोजक सुरेश गलांडे यांना स्वागत व पुष्पगुच्छ देऊन व यात्रेकरूना शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या