चिंचविहिरे येथे २३ मार्च पासुन दावल मलिक बाबा यात्रा उत्सव

राहुरी शहर /अशोक मंडलिक : तालुक्यातील चिंचविहिरे येथे दावल मलिक बाबा यात्रा उत्सव सुरु होणार आहे. या यात्रोत्सवात दि २३ मार्च रोजी रात्री ९:०० वाजता संदल मिरवणुक, गुरुवार दि २४ मार्च रोजी सकाळी ६:०० वाजता कावड गंगाजल मिरवणुक रात्री ८:०० वाजता शोभेची दारू फटाक्यांची आतिषबाजी रात्री ९:०० वाजता सौ सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. दि २५ मार्च रोजी दु १:०० वाजता टांगा शर्यती होतील तरी पंच क्रोशीतील भाविक भक्तांनी या यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा अशी चिंचविहीरे ग्रामस्थ व यात्रा कमेटीने विनंती केली आहे.

या वर्षी खालील प्रमाणे यात्रा कमेटी असुन कमिटीच्या अध्यक्षपदी मारुती नालकर, उपाध्यक्षपदी नंदूराज साळवे तर खजिनदारपदी मारुती चोथे व विजय शिंदे यांची निवड करण्यात आली. यात्रा कमिटी सदस्य म्हणून ग्रामपंचायत सरपंच बाबुराव पठारे, उपसरपंच जयराम गिते, सोसायटीचे चेअरमन दगडूभाऊ गिते, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर झांबरे, पोलीस पाटील सुधाकर नरोडे, संतोष पवार, शरद पानसंबळ, दत्तात्रय गीते, एकनाथ  नालकर, आबा धामोरे, कार्तिकी गिते, भगीरथ नरोडे, रावसाहेब पठारे, शंकर वाळके, गीताराम कोते, राजेंद्र गरुड, पोपट मुरकुटे, बाळासाहेब गिते, कचरू नालकर, भूषण नालकर, विष्णू नालकर, तुकाराम नाळकर,  जालू मुरकुटे, पवन गिते, विलास गीते, अनिल गीते, तात्याराम गीते, पुंजा साळवे, शब्बीर पठाण, वेणुनाथ लाहुंडे, बाळासाहेब नरोडे, सुनील कवाने, अरुण लाहुंदे, संजय नरोडे, योगेश पानसंबळ, नामदेव पानसंबळ, मोहन नरोडे, दीपक धामोरे, धनंजय गीते, बाबासाहेब पडागळे, रमेश नालकर आदींची समिती गठीत करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या