ना. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन


 अफसर शेख/बालानगर : पैठण तालुक्यातील बालानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा नामदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदुस्थान क्रिकेट क्लब बालानगर प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल युट्युब लाईव्ह क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन (दि.८) रोजी कापुसवाडी-बालानगर रस्त्यावरील मैदानावर करण्यात आले. 

समस्त बालानगर, कापुसवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित स्पर्धेत प्रथम पारितोषिक ४१ हजार रुपये जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांच्या वतिने तर द्वितिय पारितोषिक २१ हजार रुपये पी.आर.थोटे यांच्या वतीने दिले जाणार असुन या व्यतिरीक्त इतर वैयक्तिक बक्षिसांची रेलचेल असणार आहे.

यावेळी भारतीय महिला-C संघात खेळणाऱ्या औरंगाबादच्या उत्कृष्ट अष्टपैल्लू महिला खेळाडू प्रियंका गारखेडे, पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दत्ताभाऊ गोर्डे, जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण, गोपीनाना गोर्डे, उदयसिंह तवार, संजय छबिलवाड, अप्पासाहेब गायकवाड, बालानगरचे माजी सरपंच जाबेर शेख, अख्तर शेख, मच्छिंद्र गोर्डे, नजीर सय्यद, जाकिर सौदागर, कैलास गोर्डे, बाळूभाऊ गोर्डे, सोमनाथ तुपे, रईस शेख, अमर गोर्डे, शाहीद शेख, मुक्तार शेख, शिवाजी ओसारे व क्रिकेटप्रेमींसह मोठ्या संख्येने क्रिकेट खेळाडू व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या