राहुरी विद्यापीठ : १) प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दि. ८, ९ व १० मार्च रोजी सोसाटयाचा वारा व विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यातील काही ठिकाणी विशेषतः शेवगाव, पार्थडी, कर्जत, जामखेड व श्रीगोंदा या तालुक्यामध्ये अतिशय हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ३०-४० किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे.
२) पुढील २-३ दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
कृषी सल्ला
१) पावसाची शक्यता असल्याने काढणीला आलेल्या पिकाची काढणी करून घ्यावी तसेच काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत.
२) पावसाची व वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.
३) वीजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल ऍपचा वापर करावा.
ग्रामीण कृषि मौसम सेवा,
कृषि विद्या विभाग, मफुकृवि, राहुरी.
0 टिप्पण्या