सात्रळ सोसायटीच्या चेअरमनपदी कडू तर व्हाईस चेअरमन पदी सिनारे यांची एकमताने निवड

राहुरी/ मधुकर म्हसे : १९ डिसेंबर १९४७ रोजी स्थापन झालेल्या सात्रळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दिनकर विनायक कडू तर व्हाईस चेअरमन पदी बाळासाहेब गेणू सिनारे यांची एकमताने निवड करण्यात आली.

सदर सोसायटीने थोर स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार कॉ.पी.बी. कडू पाटील यांच्या आशीर्वादाने नुकतेच अमृत मोहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निवडणुकीत युवा नेते विक्रांत विजय कडू, पोपट एकनाथ कडू, राजेंद्र भिमाजी कडू, हंबीरराव गोविंदराव चोरमुंगे, अवधूत केशवराव चोरमुंगे, आण्णासाहेब मुरलीधर कडू, पोपट बबू पलघडमल, सौ. कमल सोपान दिघे, सौ. सुजाता रंजय कडू, गोरक्ष नामदेव अंत्रे आदींचा नवनियुक्त संचालक मंडळात बिनविरोध निवड झाली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे ज्येष्ठ नेते अरुण कडू पाटील, संभाजी पा. चोरमुंगे, विजय कडू, किरण कडू आदींनी अभिनंदन केले आहे. निवडणुकीचे कामकाज सहाय्यक निबंधक कार्यालय अहमदनगर येथील सौ. जे.जी.हराळे मॅडम तसेच सोसाटीचे सचिव सिनारे व सहसचिव संदिप वाघचौरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या