ढोरकीन शिवारातील महावितरणच्या डिपीत तिसऱ्यांदा बिघाड


शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया 

पैठण : तालुक्यातील ढोरकीन येथील धनडी नदी परिसराच्या शेत शिवारातील महावितरणची मापारे डिपी क्रमांक १ मध्ये जवळपास गेल्या विस दिवसांत तिसऱ्यांदा बिघाड झाला असून हि डिपी सतत जळत असल्याने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. डिपी दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी तिन वेळा वर्गणी करुन दुरुस्ती करुन घेतली. या डिपीवर अतिरिक्त भार असल्याने डिपीत वारंवार बिघाड होत असल्याची चर्चा शेतकऱ्यामध्ये होताना दिसत आहे. तरी महावितरणने या परिसरात नविन डिपी देवून विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे. 

दरम्यान पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विहीरी, बोअर मध्ये बसवलेल्या मोटारी (पंप) अनेकदा बंद राहत आहे. परिणामी गहु, कांदा, हरबरा आदी पिके ऐन मोसमात असतानाच पाणी देता येत नसल्याने व डिपी जळाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. तसेच पीकांना पाणी देण्याची चिंता आता येथील शेतकऱ्यांना लागली आहे. याठिकाणी तात्काळ नविन डिपी बसवावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. याठिकाणी डिपी लवकर मिळावी यासाठी ढोरकीन येथील महावितरण कार्यालयाने पाठपुरावा करुण ढोरकीनच्या मापारे डिपी क्रमांक १ ची लवकर दुरुस्ती करण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या