गोदागिरी फार्म्स द्वारे गांडूळखत प्रकल्पाची उभारणी

राहुरी : तालुक्यातील त्रिंबकपूर येथे अविनाश शेळके यांच्या शेतावर श्रीरामपूर येथील गोदागिरी फार्म्स ग्रुप तर्फे गांडुळखत प्रकल्पाची उभारणी केल्याची माहिती ग्रुपच्या संचालिका सौ. रुपाली औताडे यांनी दिली. गावामध्ये स्थापना केलेला हा दुसरा प्रकल्प असून उपलब्ध शेणाचे गांडुळ खत व व्हर्मिवाश तयार करून शेतामध्ये वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

रासायनिक खतांच्या व कीडनाशकांच्या वाढलेल्या किमती, कृत्रिम टंचाई व दिवसेंदिवस कमी होत चाललेला जमिनीचा पोत या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांचा कल पुन्हा सेंद्रिय कीडनाशके व खतांकडे वाढत आहे. गांडूळ खत व व्हर्मिवाश तयार करण्यासाठीची सर्व सामग्री शेतकऱ्याकडे उपलब्ध असून सरासरी अडीच रुपये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या शेणखताचे गांडूळ खतात रूपांतर व मूल्यवर्धन करून प्रति किलो दहा रुपये किमतीत विक्री करता येते. त्याच बरोबर गांडूळ कल्चर व व्हर्मिवाश सुद्धा विक्रीस उपलब्ध होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सदर प्रकल्पाच्या उदघाटनावेळी रावसाहेब भोपळे, पोपट शेळके, ज्ञानदेव शेळके, जगन्नाथ आढाव, अजित आढाव, विलास निमसे व अमोल निमसे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या