निळवंडे लाभधारक शेतकर्यांकडुन महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त करुन आनंद साजरा

राहुरी : आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात निळवंडे प्रकल्पासाठी 365 कोटीची भरीव तरतूद केल्याबद्दल महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, ना. बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री ना. बच्चुभाऊ कडू, ना. प्राजक्त तनपुरे, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोषजी काळे या सर्वांचे निळवंडे लाभधारक शेतकर्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निळवंडे प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावा व लाभ क्षेत्राला लवकरात लवकर पाणी मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज या भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देत जीवन जगत असलेला शेतकरी सुखी होणार आहे. या पाटपाण्याचा सात तालुक्यातील १८२ गावांना फायदा होऊन लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

या निर्णयामुळे या परिसरातील निळवंडे लाभधारक शेतकरी समृद्ध होणार असल्याने निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने मार्गदर्शक गोपीनाथ पाटील घोरपडे, अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील वर्पे, कार्याध्यक्ष गंगाधर पाटील गमे, सामाजिक कार्यकर्ते तथा सचिव दादासाहेब पाटील पवार, मच्छिंद्र पाटील एलम, संजय पाटील एलम, जालिंदर लांडे, रावसाहेब कोल्हे, रविंद्र वर्पे, डॉ रविंद्र गागरे, किरण गव्हाणे, ह.भ.प.संजय महाराज शेटे, ह.भ.प.विनोद महाराज मुसमाडे, सोपानराव जोंधळे, चंदन काका मुसमाडे, अरूण पोकळे, विजय ढोकचौळे, नितीन गमे, रामनाथ बोर्हाडे, सुभाष निर्मळ, योगेश निर्मळ, राजेंद्र निर्मळ, विजय निर्मळ, अशोक खंडागळे, दिनकर(बाबा) लोंढे, संदीप गमे, महादू कांदळकर, किशोर गागरे, हारदे दिपक, हारदे अनिल, गणेश लोंढे, गणेश मुसमाडे, किरण गागरे यांच्यासह निळवंडे पाटपाणी कृती समिती अहमदनगर नाशिक च्या लाभधारक शेतकरी बांधवांनी ना. बाळासाहेब थोरात यांचे विशेष आभार व्यक्त करत आनंद साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या