राहुरी / बाळकृष्ण भोसले - ग्रामीण स्तरापासून ते शहरीकरणाच्या विविध स्तरापर्यंत स्त्रियांना समान संधी द्यावी, हेच महिला दिनाचे औचित्य ठरेल. समाज उन्नतीसाठी स्त्री सबलीकरणाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य नानासाहेब शेळके यांनी केले.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरुवातीला प्राचार्य नानासाहेब शेळके, उपप्राचार्य रामचंद्र डोळे आणि महिला शिक्षकांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत हिरा चौधरी यांनी केले. याप्रसंगी सर्व महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा प्रातिनिधिक रित्या सन्मान करण्यात आला.
यावेळी वैष्णवी गोल्हार, वैष्णवी धनवटे, विशाखा दरंदले, ईश्वरी चेचरे या विद्यार्थिनींनी तर शिल्पा राऊत, सुवर्णा भोर, मोनाली पानगव्हाणे व उपप्राचार्य रामचंद्र डोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य नानासाहेब शेळके होते. त्यांनी आपल्या भाषणातून महिला दिनानिमित्त देशातील कर्तबगार महिलांच्या कार्याचा उल्लेख करून आदर्श आणि प्रेरणा घेण्याचे आवाहन केले; तसेच समाजात स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात प्रत्येक कुटुंबातून व्हावी, महिलांना घरापासून ते इतर विविध क्षेत्रात समानतेची संधी दिली जावी, असे त्यांनी सूचित केले.
यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख शरद दुधाट, जवाहर पांडे, राजेंद्र क्षिरसागर, अशोक साळवे, ज्ञानदेव दवंगे, दिपक धोत्रे, दीप्ती रूपवते, प्रियंका लोंढे, सोनाली गुंजाळ, सोनम चव्हाण यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा ठोकळ यांनी केले तर शेवटी विनिता तांबे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या