विट वाहतूक करणाऱ्या वाहनाने केला मेंढरांचा चुराडा


हृदयदायक घटना, तेरा मेंढरांचा चेंदामेंदा; सात जखमी

◾औरंगाबाद बीड रोडवरील भालगाव फाट्यावरील घटना

पाचोड/विजय चिडे : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव फाट्या जवळ मेंढरांचा कळप जात असताना विट वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे वाहनावरून अचानक नियंत्रण सुटल्याने ते वाहन कळपात घुसल्याने तेरा मेंढरं जागीच ठार झाले असून सात मेंढरं गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार (दि,१६) रोजी औरंगाबाद तालुक्यातील भालगाव फाट्यावर घडली.

अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील गेवराई आगलावे येथील शेतकरी नानासाहेब दत्तू भावले हे अल्पभूधारक शेतकरी असून थोड्या शेतीवर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत नसल्याने त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय सुरू केला. मागील दोन महिन्यांपासून भालगाव, एकोड पाचोड, आपतगाव, कचनेर आदी शिवारात मेंढ्या चरण्यासाठी नानासाहेब भावले हे घरापासून दूर होते. मेंढ्याचे पालनपोषण करून यावरच कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र बुधवारी सकाळी मेंढरं महामार्गाच्या कडेने जात असताना वाहनचालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि वाहन कळपात घुसले. त्यावेळी १३ मेंढर मयत झाले तर ७ जखमी असून मृत मेंढरे जवळ पास अर्धातास रस्त्यावर पडून होती. या घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ चिकलठाणा पोलीस ठाण्यात दिली असता पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावरील मृत मेंढरं बाजूला काढून ये-जा करणाऱ्या वाहनांना रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा चिकलठाणा पोलिसांनी पंचनामा केला असून पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या