डाॅ.आंबेडकर पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ भीम गर्जना संघटनेच्या वतीने पोलीसांना निवेदन

भीमगर्जना सामाजिक संघटनेचे पदाधिकारी बिडकीन पोलिस ठाण्यात निवेदन देताना.


पैठण : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर व यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका बेलोरा या दोन्ही ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर काही समाज कंटकांनी काळी शाई टाकून विटंबना केली. त्या घटनेचा निषेधार्थ शनिवारी (दि.५) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाई पठाण यांच्या आदेशाने भीमगर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन समाज कंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन बिडकीन पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना देण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटने मुळे भारत देश लोकतंत्र आहे व त्यांचे या देशासाठी मोठे योगदान आहे. अशा महापुरुषांची जर या देशात बदनामी केली जात असेल तर ती संघटना कदापि खपुन घेणार नाही. अशा तीव्र शब्दांत निषेध करत, त्या समाजकंटकावर त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी संघटनेचे मराठवाडा प्रसिध्दी प्रमुख इलियास शेख, पैठण तालुकाध्यक्ष अर्शद शेख, बिडकीन शाखा अध्यक्ष कृष्णा लोखंडे, शाखा उपाध्यक्ष उमेर बागवान, सोशल मिडीया तालुकाध्यक्ष मिर्झा फेरोज, तालुका कार्याध्यक्ष शेख राजू, सुभाष मामा राठोड आदींची उपस्थिती होती.

    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या