पाचोडच्या दोन परिक्षा केंद्रावर २८८ विद्यार्थ्यांने दिली परिक्षा

विद्यार्थ्यांची परिक्षा पुर्वीच गेटवरती तपासणी करतांना शिक्षक (छाया : विजय चिडे, पाचोड)

पाचोड : कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर प्रथमच दहावीची ऑफलाइन परीक्षा होत असून (ता.१५ मार्च) पासून परीक्षेला सुरुवात झाली असून पाचोड येथील शिवछत्रपती उच्च महाविद्यालय व जवाहर कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचा पहिला पेपर सुरळीत पार पडला असून २८८ विद्यार्थ्यांने पहिल्याच दिवशी परिक्षा दिली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली नव्हती. त्यामुळे अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारेच विद्यार्थ्यांना गुणदान करून उत्तीर्ण करण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे परीक्षा मंडळाच्यावतीने दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. पाचोड येथील शिवछत्रपली उच्च माध्यमिक महाविद्यालयात ८४ विद्यार्थ्यांने सुरळीत परिक्षा दिली असुन या परिक्षेसाठी उपकेद्र प्रमुख संचालक एकनाथ फटांगडे, रनर अशोक गायकवाड सह लतिफ सय्यद यांच्या सहकार्याने परिक्षा पार पडली तर जवाहर कनिष्ठ महाविद्यालयात २०४ विद्यार्थी परिक्षेला बसले असून केंद्र प्रमुख कल्याण पिवळ सह केंद्रप्रमुख राजेंद्र धांडे, रनर विजयकुमार लिहिनार, ए.बी.जाधव यांच्या निदर्शनाखाली मराठी पेपर सुरळीत पार पाडला आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षक, पालक यांनी सकारात्मक प्रयत्न करून ,विद्यार्थ्यांनी ताण, तणाव न घेता अभ्यास करून परीक्षेला उत्साहाने सामोरे गेले असून दहावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यात मंडळाला यश आले आहे. या परिक्षेसाठी पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या