लोणी - कोरोना परिस्थितीमुळे मागील काही वर्षे सर्वे महाविद्यालये बंद होते व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू होते आता पुन्हा सर्वं महाविद्यालये गजबजले व आलेल्या प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा परिचय सर्वांना व्हावा, शैक्षणिक नियम-अभ्यासक्रम ओळख व नवीन विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयाविषयी आत्मियता निर्माण व्हावी याच अनुषंगाने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ व अभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पायरन्स इन्स्टिट्यूट एम बि.ए.चे संचालक डॉ.वाय एन सायंकर व अध्यक्षस्थानी कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्रा.प्रविण गायकर, प्रा.मिनल शेळके या वेळी मंचावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वतःचे डेव्हलपमेंट केली पाहिजे त्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग नोंदवला पाहिजे जेणेकरून तुम्ही नक्कीच उच्च पदावर पोहचेल व उच्च पदावर गेले तर नक्कीच तुमच्या परिवाराचे व तुमच्या महाविद्यालयाचे नाव नौकीक होईल असे प्रतिपादन डॉ.सायंकर यांनी केले.
डॉ.शुभांगी साळोखे यांनी आपल्या भाषणात सांगतांना शिक्षण घेत असतांना तुम्ही तुमचे ध्येय आधी निवडले पाहिजे बायोटेक करत असतांना विद्यार्थ्यांना रिसर्च करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थरावर नाव नौकीक करण्याची खूप संधी आहे. महाविद्यालयात असतांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, अनुभवनात्मक शिक्षण या गोष्टी कडे पण लक्ष दिले पाहिजे. भारत हा शेतीप्रधान देश आहे,भारतात सुमारे ७० % लोक शेतीवर अवलंबून आहेत त्यासाठी शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना माहीत व्हावे व शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील व आमदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी २००३ साली महाराष्ट्रात पाहिल्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची स्थापना लोणी येथे केली अशी माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे सर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचिका चौधरी हिने केले तर प्रास्ताविक सृष्टी फुलझेले व आभार प्रदर्शन आश्लेषा काठे आणि तुपे शुभम यांनी केले. सदर कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी द्रुतीय, तृतीय आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या