पोलीस मित्र संघटनेच्या प्रदेश संघटक पदी जावळे

अहमदनगर/ जावेद शेख : स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटना अंतर्गत असलेल्या पोलीस मित्र संघटनेच्या गाव तिथे शाखा या माध्यमातून शिरूर शाखा व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका शाखेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे यांनी संतोष जावळे यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड केली तर संतोष आहेर पाटील यांची अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख पदी निवड केली. संतोष जावळे व संतोष आहेर यांना पारनेर चे नगराध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य निवड समिती प्रमुख प्रतिक्षा यशवंत, पारनेर तालुका संपर्कप्रमुख निशांत शेळके, तालुकाध्यक्ष रोहित शेळके, जिल्हा उपाध्यक्ष स्वामीनाथ साके, पारनेर महिला तालुकाध्यक्षा मृणाल जाधव, मार्गदर्शक मारुती आडागळे, प्रसिद्धीप्रमुख सुप्रिया जाधव, सोनी गुप्ता उपाध्यक्षा, सुप्रिया रामसिंग पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, शिरूर तालुकाध्यक्ष शेखर मासाळ, जिल्हा महिला संपर्कप्रमुख साक्षी गायकवाड, संघटक आरती मोहिते, कार्याध्यक्षा अश्विनी सुके, प्रसिद्धीप्रमुख आरती रणसिंग, कोषाध्यक्ष धनश्री नरवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष जावळे व जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख संतोष आहेर यांच्या निवडीबद्दल सौ श्वेता व्हनमाने, सौ धनश्री उत्पात, भरतजी नजन, वजीर शेख, रमेश जोशी, निजाम पटेल, उमेश काशीकर आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या