बचत गटातील महिलानी मोठ्या प्रमाणात आत्मनिर्भर भारत योजनेत सहभागी व्हावे- हरगोविंद चौबे

जागतिक महिला दिनानिमित कल्याणकारी योजना विषयी संवाद मेळावा

भारत सरकारच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, अमरावतीचा उपक्रम

दर्यापूर/अमरावती : जागतिक महिला दिनानिमित देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. या दिनाचे औचित्य साधून महिलाना आर्थिक स्तरावर आत्मनिर्भर बनवन्यासाठी क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो व नगर परिषद दर्यापुर यांच्या सयुंक्त विद्यमाने केंद्र सरकार तर्फे महिलासाठी प्रभावीपणे राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजना विषयी माहिती देण्याकरिता विशेष महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

केन्द्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो अमरावती तर्फे सरकारच्या विविध योजना, उपक्रम, नीती-धोरनाची माहिती गावातील शेवटच्या पर्यंत पोहचवन्याचे कार्य केले जाते. याप्रसंगी प्रमुख वक्ता छतीसगड राज्याचे राज्य वित्तीय समावेशन समिती सदस्य हरगोविंद चौबे म्हणाले केंद्र सरकार तर्फे महिलांचा आर्थिक स्तर मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात. जसे स्टार्ट अप इंडिया, स्टैंड अप इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि मुद्रा योजना, जीवन ज्योती योजना या सारख्या अनेक योजनां राबविल्या जात आहेत. संबधित योजनाची परिपूर्ण माहिती नसल्याने मोठ्यप्रमाणात महिला लाभापासून वंचित राहतात. विशेषकरुन ग्रामीण भागातील महिला व महिला बचत गट विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडले जात नाही. बैंक तर्फे आर्थिक योजनाचा फ़ायदा घेताना येना-या अडचनी व उपाययोजना विषयी मेळाव्यात सविस्तर माहिती दिली.

नगर परिषद दर्यापुरचे मुख्याधिकारी पराग वानखड़े यानी नगर परिषद तर्फे राबविल्या जात असलेल्या विविध नाविन्य उपक्रमा विषयी माहिती दिली. व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंचावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला,बँक ऑफ महाराष्ट्रचे लोन अधिकारी रवींद्र पाखरे,स्टेट बँकेचे फील्ड अधिकारी भूषण वानखडे, कार्यालय अधीक्षक राहुल देशमुख, स्थापत्य अभियंता कु.दर्शना गावंडे, सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव, प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धा,पाककला स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, निबु चमचा स्पर्धा, पोत्याची स्पर्धा, तीन पायाची स्पर्धा, संगीत खुर्ची, आनंद मेळावा व वृक्षारोपण आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंद्रवदनसिंह झाला व सूत्रसंचालन ज्योती सोमवंशी आणि आभार विलास घोगरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या