लोणी - लोकनेते डॉ. बाळसाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सादतपूर ता-संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील रासेयो संचालक डॉ.महावीरसिंग चौहान तसेच प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्राचार्य निलेश दळे, आणि प्राचार्य रोहित उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिबिर आयोजित केल्याची माहिती रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली.
सदर शिबिराचे उदघाटन सादतपुर येथील सरपंच सौ.अंजनीताई कडलग, उपसरपंच प्रकाश गोरे, कामगार पोलीस पाटील विजय मगर, ग्रामविकास अधिकारी सौ. रोहिणी नवले, सादतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.वाघमारे, माजी उपसरपंच संदिप कडलग, सागर कडलग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी संदीप कडलग यांनी स्वयंसेवक यांनी मागील वर्षी घेतलेल्या शिबिराचा गावातील विकासात मोठा वाटा असल्याचे सांगितले तसेच यावर्षी सांडपाणी व्यवस्थापन यावरती कार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी रासेयो चे गावकऱ्यांनी कौतुक करावे असे कार्य स्वयंसेवकांनी करावे स्वतःला गावाशी जोडून घ्यावे असे सांगितले. या सात दिवसाच्या शिबिरात विविध प्रकल्प सादतपूर या गावात राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण आणि नैसर्गिक संवर्धन, सर्वांगीन ग्रामीण विकास, स्वच्छता अभियान, व्यक्तिमत्व विकास, बेटी बचाव, हागणदारी मुक्त अभियान, वृक्ष लागवड इ.उपक्रम समाविष्ठ आहे. तसेच गावात पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम, विविध व्याख्याने आयोजित केली आहे.
शिबिराच्या या उदघाटन प्रसंगी प्रा.रमेश जाधव, प्रा.संतोष वर्पे, प्रा.किरण गोंटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम पार पाडण्यासाठी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर, प्रा.राहुल विखे आणि प्रा.संदीप पटारे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंसेविका वेदिक वारघडे तर आभार अमोल माने याने व्यक्त केले.
0 टिप्पण्या