अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील डोंगराळ, निसर्गरम्य वातावरणात शिवगौरव पुरस्कार वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला.
शेरी चिखलठाण येथील शिवप्रेमी हे दरवर्षी शिवजयंती व शिवगौरव पुरस्कार योग्यरीत्या नियोजनबद्ध साजरा करतात. अप्रतिम शिव परिवार आयोजित अविस्मरणीय सोहळा आयोजन करून पुरस्कार मानकरी यांना शिव गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावेळी उपस्थित सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सौ. मिराताई धनराज कदम, प्रसिद्ध व्याख्यात्या व अनाथांची आई यांनी आपल्या ओधवत्या वाणीतून आबाल वृध्दांना खिळून ठेवलेे. सेवासदन हिंगोली धनराज कदम, कोंडाजी येवले, नारायण तमनर, दै.हिंदुसम्राट राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख, आबासाहेब काळनर, डॉ. सुभाष काकडे, सचिन मोरे, मनोहर इनामदार, सुरेश वाबळे, शांताराम काकडे आदि प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते वैद्यकिय क्षेञातील डॉ.रविकिरण वने, डॉ.नितीन खांदे, डाॅ.उज्वल सरकार, डॉ.सुभाषचंद्र वैद्य, डाॅ.विजय काळे, डाॅ.अंजली मंडलिक, पत्रकार क्षेत्रातील अनिल कोळसे, शेख युनुस भडकत्या ज्वाला प्रतिनिधी, चेतन कदम, सामाजिक महिला सौ.विद्याताई करपे व महिला मंडळ, कृषी क्षेत्रातील रखमाजी जाधव, विजय डोमाळे, गायन क्षेत्रातील ज्योती वर्पे, श्रुति वर्पे, शिवशाहीर अक्षय डांगरे, पशू वैद्यकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेञातील सचिन मोरे, नंदकुमार दिघे, संदिप साकुरे, मनोहर इनामदार, गंगाराम जवरे, सजेंराव मुसळे, योगेश सरोवते, सौ.रीना रायकर, सौ.हिरा चंदने, ह भ प गाडेकर तसेच दुर्गसेवक धनंजय निलसकर, नाशिक शिवकन्या देवांशी, दादा वाघ आणि शालेय विद्यार्थीनी शबनम युनुस शेख जिल्हास्तरीय, वैष्णवी जालिंदर अडसुरे, श्रृंती रामनाथ कणसे गुणवंत विद्यार्थीनी, निरज दतात्रय पठारे, साहिल शेख, महेक फारुक मोमीन आदि पुरस्कार विजेत्यांना शिवगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक शिवप्रेमी शांताराम काकडे, चांगदेव काकडे, राजाराम काकडे, सागर काकडे, साईनाथ काकडे, प्रभाकर काकडे, राजू मुकींदा काकडे, संजय काकडे, तसेच महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन गंगाभाऊ काकडे यांनी केले आणि आभार विठ्ठल काकडे यांनी मानले. भोजन स्वाद करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
0 टिप्पण्या