उघड्यावर टाकलेल्या मळी मुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदुषित... नागरिकांना प्यावे लागते पिवळसर पाणी...

संतप्त ग्रामस्थांचे ग्रामसेवकांना निवेदन... 
अहमदनगर/ जावेद शेख : बिरेवाडी फाट्यानजीक श्री. व्यंकटेशा फर्टिलायझर्स लि. कंपनीसाठी लागणारी मळी उघड्यावर टाकण्यात आल्यामुळे परिसरातील पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचे स्रोत विहीर, कुपनलिका प्रदुषित होण्यास सुरुवात झाली आहे. एन उन्हाळ्यात कुठलाही पाण्याचा स्रोत उपलब्ध नसताना पिवळसर पाणी चिंतेचा विषय बनला आहे.

पिवळसर पाण्याची तीव्रता लक्षात घेता, येत्या पावसाळ्यात संपूर्ण परिसरातीलच पाणी दूषित (पिवळसर) होईल. परिसरातील सर्वच पिण्यायोग्य असणारे पाण्याचे स्रोत प्रदुषीत होत आहे तरी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात. चारही बाजूने भिंत बांधून, वरून पूर्णपणे शेड बांधणे. मळी टाकण्याच्या ठिकाणी खाली पीसीजी करणे. मळीवर पडणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करणे, सदर पाणी इतरत्र नळीला किंवा ओढ्याला सोडू नये. उघड्यावर टाकलेली मळी पूर्णत: उचलून कंपाऊंडच्या आत घेणे. टाकलेल्या मळीचा वास बाहेर येऊ न देणे. सदरची मळी पूर्णपणे बंदिस्त रित्या साठविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यापूर्वीच सदर कंपनीला केली होती. प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून देखील मागील दोन वर्षांपासून प्रशासनाकडून देखील सदर गोष्टीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे अशी कुजबुज नागरिकांध्ये होत आहे. सध्या विहीर, कुपनलिका प्रदुषित होण्यास सुरुवात झाल्यामुळे आतातरी प्रशासनाने यात लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यामध्ये प्रदूषित झालेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविणार असल्याचे ग्रामसेवक नितीन पवार यांनी सांगितले. वेळीच उपायोजना केल्या तरच परिसरातील नागरिक, बालकांचे व पशुधनाचे आरोग्य अबाधित राहील, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रसंगी सर्वश्री रोहित भोसले, दत्तात्रय सागर, नवनाथ ढेंबरे, पंढरीनाथ ढेंबरे, संदीप ढेंबरे, बाळासाहेब ढेंबरे , शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे, लहानु सागर, नाना सागर, दीपक सागर, गणेश ढेंबरे, दिलीप ढेंबरे, योगेश ढेंबरे आदी बिरेवाडी (फडवस्ती) येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या