गर्दी नियंञणात आणण्यासाठी पोलिस मिञ संघटना मदतीला धावून आली.
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षा पासुन देवळाली प्रवरा येथिल श्री. समर्थ बाबुराव पाटील महाराज याञा बंद ठेवण्यात आली होती. या वर्षीच्या याञेत गर्दीने उच्चांक मोडला. तर याञा उत्सवात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली. कुस्ती हगामात अनेक मल्लांनी सहभाग नोंदविला या वर्षाची समर्थ बाबुराव पाटील चांदीची गदा नगर येथिल अक्षय पवार याने पाच हजाराच्या बक्षिसासह पटकविली. हिंगोली येथिल किरण मोरे याचा पराभव करताना निर्णायक कुस्ती करण्यात आली. भाविकांनी याञा उत्सवाचा आनंद घेतला. पोलिस मिञ संघटना मदतीला धावून आल्याने गर्दीवर नियंञण मिळविता आला.
श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज याञा दोन वर्षा नंतर साजरी करण्यात आल्याने यावर्षीचा याञा उत्सव मोठ्या प्रमाणात गर्दीने उच्चांक मोडला. त्याच प्रमाणे खेळणी व इतर साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या दुप्पट दिसुन आल्याने अनेक दुकानदारांना दुकान लावण्यास जागा मिळाली नाही.
याञा उत्सवाची सुरवात सोमवार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाने झाली. ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पादुका व पालखी पुजन करुन छबिना मिरवणूकीस पारंभ झाला.याञा उत्सवात सहभागी झालेल्या बँण्ड पथकाने देवळालीकरांची मने जिंकल्याने बँड पथकास मोठा प्रतिसाद मिळाला. शोभेची आतिषबाजी मध्ये बेलापूर येथिल फिरोज शेख, वांबोरी येथिल परवेज शेख, संगमनेर येथिल बी एस फायर वर्क्स् जैहुरभाई आदींनी आकर्षक आतिषबाजी केल्याने भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कुस्त्यांचा हंगामात अनेक मल्लांनी (पैलवान) यांनी सहभाग घेतला हिंगोलीचे किरण मोरे व अहमदनगरचा अक्षय पवार यांची निर्णायक कुस्ती झाली. या सामन्यात अक्षय पवार याने किरण मोरे यास चिटपट केल्याने यावर्षीचा चांदीच्या गदेचा मानकरी ठरला आहे. पाच हजाराचे रोख बक्षिस हि त्याने पटकवले आहे. बहारदार लावण्याचा रसिकांनी आनंद लुटला आहे.
या याञा उत्सवात राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण दराडे यांचे माञ दुर्लक्ष झाल्याचे दिसले. याञेत गर्दीचा उच्चांक झालेला असताना बंदोबस्तासाठी पो.हे.काँ. प्रभाकर शिरसाठ व पो.काँ. शशिकांत वाघमारे या दोन पोलिसांनी नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला महिला व लहान मुलांच्या गळ्यातील दागिणे ओरबडणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले होते. परंतू सक्षम महिला अधिकारी उपस्थित नसल्याने अटक न करता सोडून द्यावे लागले. तसेच भाविकांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या चौघे जण पोलिस बळ नसल्याने गुंगारा देवून पसार झाले. पुरेसे पोलिस बळ असते तर सात गुन्हेगार पोलिसांना गजाआड करता आले असते. गर्दीवर नियंञण मिळविण्यासाठी पोलिस मिञ संघटना मदतीला धावून आली.
दोन वर्षा नंतर याञा भरल्याने दोन दिवस याञा उत्सवात गर्दीचा उच्चांक झाला. वाढलेल्या गर्दीमुळे याञा उत्सवात कोट्यावधीची उलाढाल झाली असुन यावर्षीच्या देवळाली प्रवरातील याञेवर व्यापारी वर्ग खुश झाला होता.
याञा उत्सवाचे नियोजन डाँ.विश्वास पाटील, गणेश भांड, सतिष वाळुंज, बाळासाहेब चव्हाण, संजय पाटील, शुभम पाटील, कुणाल पाटील, अनिल पाटील, विनोद पाटील, डाँ.नामदेव कडू, दत्ता कडू, मुरलीधर कदम, नानासाहेब पठारे, संतोष चोळके, बाळासाहेब खुरुद, अशोक खुरुद, भाऊसाहेब गडाख, बाळासाहेब खांदे, संदिप कदम, बाबासाहेब मुसमाडे, कृष्णा मुसमाडे, सतिष होले, गजानन येवले, शिवाजी मुसमाडे, जेम्स पाळंदे, धनंजय शिंदे, अनिल ढुस, दिपक पठारे, महेश गडाख, संदिप कडू, रविंद्र मुसमाडे, सतिष राऊत, दत्ताञय गडाख आदी केले होते.
पोलिस मिञ संघटनेने याञा उत्सवात चोख बंदोबस्त ठेवला. सचिन दिघे, जावेद सय्यद, समीर शेख, दिनेश जोशी, गणेश हिंगे, मनोजकुमार गदिया, शंकर कवाणे, योगेश वाघ, संजय जाधव, दिपक गुलदगड, लहाणु जोशी, लक्ष्मण घाडगे, तुषार घाडगे, सोन्याबापू तनपुरे, दादा धसाळ आदी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या