शबनम शेख चा शिवगौरव, शिक्षक संघ आणि गुरू माऊली मंडळ या पुरस्काराने गौरव

अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील शबनम युनुस शेख या शालेय विद्यार्थीनीने जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये भरघोस यश संपादन करून गावात, तालूक्यात आणि जिल्ह्यात आपले व शाळेचे नांव लौकिक केले आहे.

शबनम हि शालेय शिक्षणात फार हुशार, चंचल, मनमिळावू असल्याने ती खेळात, हस्तलिखित परिक्षेत, भाषणात पटाईत, चाणक्य बुद्धीची असल्याने तिच्या ह्या सन्मानाने, गौरवाने संपूर्ण शिक्षक वर्गातून व शेरी चिखलठाण पंचक्रोशीतील जनतेकडून अभिनंदन व गौरव होत आहे. शिक्षक संघ व गुरू माऊली मंडळ राहुरी यांच्या वतीने आणि मुख्याध्यापक संघ, पदवीधर संघ, महिला आघाडी, नगरपालिका संघव उच्चाधिकार समिती राहुरी राजकुमार साळवे जिल्हाध्यक्ष गुरुमाऊली मंडळ व बापुसाहेब तांबे जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ यांच्या वतीने आदर्श शिक्षक विठ्ठल रघुनाथ काकडे यांच्या हस्ते शबनम शेख हिस सन्मानपत्र देऊन गौरव पुरस्कार देण्यात आला.

शेरी चिखलठाण येथील शिवप्रेमींनी आणि समस्थ गांवकरी यांच्या वतीने शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मान पत्रासह शांताराम काकडे, लोकनियुक्त सरपंच डॉ. सुभाष काकडे, उपसरपंच आबासाहेब काळनर, गंगाधर काकडे, चांगदेव काकडे, गाडेकर सर, दुधावडे सर, सारोक्ते सर, पत्रकार शेख युनुस, सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे आणि समस्थ महिला, गांवकरी यांच्या वतीने शबनम शेख, महेक मोमीन, साहिल शेख, आर्यन बागुल या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या