सामाजिक वनीकरणाने पुरली मुरूमात झाडे

बालानगर-पोरगाव या रस्त्याच्याकडेला झाडे लावण्याऐवजी हिरवी झाडेच पुरल्याचे दिसत आहे.

◾पैठण तालुक्यातील बालानगर-पोरगाव रस्त्याच्या दुतर्फा रस्त्यावरील हा प्रकार

पैठण : राज्यातील वनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची पैठणच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी थट्टा केल्या दिसत आहे. पैठण तालुक्यातील बालानगर-पोरगाव रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी खोदलेल्या खड्डयात काळी माती न टाकता मुरूमामध्ये (झाडे) पुरली तर काही झाडे न लावताच खड्डयात पुरली असल्याचे प्रकार घडला आहे. बालानगर-पोरगाव या सात किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा हा प्रकार दिसत आहे. विषय म्हणजे या रस्त्यावर लावण्यात आलेल्या फलकात किती वृक्ष या रस्ताच्या दुतर्फामध्ये लावण्यात येणार आहे हे देखील त्यात नमूद केलेले नाही.

पर्यावरण समतोलासाठी सरकारने राज्यात व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड हाती घेतली आहे. राज्यात वृक्ष लागवड करण्यात येत आहेत. लागवडीची प्रमुख जबाबदारी वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या खांद्यावर आहे. अन्य यंत्रणांकडूनही ही जबाबदारी पार पाडण्यात येत असून या यंत्रणांचे वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवडीकडे लक्ष आहे. 

यात सामाजिक वनीकरणाने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून लागवडीचे उद्दिष्ट गाठण्याचे नियोजन केले आहे. यातूनच रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदण्यात आले. त्यात काळी माती टाकून वृक्ष लागवड होण्याची आशा असतानाच वनीकरण विभागाने खड्डयात रोपटे टाकून खड्डयातून बाहेर काढलेला मुरूम पुन्हा त्यात टाकत मुरूमातच रोपटी पुरली आहे. तर काही रोपे न लावताच पुरली आहे. यामुळे काही दिवसातच या रोपट्यांचे होत्याचे नव्हते होणार असल्याच्या प्रतिक्रिया वृक्षप्रेमी नागरिकांनी व्यक्त केल्या.

मुरूमामध्ये पुरलेल्या रोपट्यांची छायाचित्र सध्या सोशल मिडियावरून व्हायरल झाली असून सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्याची लख्तरे वेशीला टांगली जात आहेत. मागील वर्षीही वनीकरण विभागाने अशाच पद्धतीने या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली होती. त्यापैकी किती वृक्ष जगली, हा संशोधनाचा विषय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या