निराधार महिलांना शेळी वितरण हा स्तुत्य उपक्रम-उद्योजक किशोर निर्मळ

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : भूमी फौंडेशनवतीने या ठिकाणी ग्रामीण भागातील वंचित घटक जे आहेत व कोरोनामुळे विधवा झालेल्या परावलंबी निराधार महिलांना शेळी वाटपाचा हा स्तुत्य कार्यक्रम आहे. अशा उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे गौरवोद्गार प्रभात उद्योग समूहाचे किशोर निर्मळ यांनी श्रीरामपूर आशीर्वादनगर येथे जागतिक महिला दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनी झालेल्या शेळी वाटप प्रसंगी काढले.

प्रारंभी मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रास्तविक भूमी फौंडेशन संस्थापक प्रा.कैलास पवार यांनी केले. ते म्हणाले सिने निर्माती अलका कुबल यांच्या मार्गदर्शनातून हि संस्था अनेक वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक कार्य ग्रामीण भागासह उत्कृष्ट करीत आहे. गोरगरीब निराधार महिलांना किराणा कीट वाटप, निराधार कृषक कन्यांना आर्थिक मदत, निराधार कर्णबधीर व्यक्तींना मोफत श्रवण यंत्रे वाटप, कोरोना काळात परदेशातून डॉक्टरांचे मार्गदर्शन, चिपळूण पूरग्रस्तांना अन्न वस्त्र मदत, तृतीय पंथीय समाजाला न्याय हक्कासाठी योगदान, १०० शेळ्या वाटप करण्याचा निर्धार आहे. असे अनेक उपक्रम हाती घेत आहोत. सूत्र संचालन व जागतिक महिला दिनाचे महत्व विमा प्रतिनिधी शितल गोरे यांनी केले.

यावेळी प्राचार्य टी इ शेळके, डॉ बाबुराव उपाध्ये, वसंतराव मुठे, दिनकर यादव, मनीषा कोकाटे आदींनी मनोगत व्यक्त केले. कचरू महांकाळे यांनी या कामी सहकार्य केले. या कार्यक्रमास शिवाजीराव बारगळ, भीमराज बागुल, बी आर चेडे, श्रीमती नाईक, कचरू महांकाळे, भाऊसाहेब गोरे, तनपुरे आदींसह महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.

आज या कार्यक्रमात अनुराधा शिंदे बेलापूर, जनाबाई पवार हरिगाव, मोनिका डांगे हरिगाव, सुशीला पवार शिरसगाव, पार्वताबाई शिंदे रामपूर, भागुबाई जाधव महांकाळवाडगाव, परीगाबाई जाधव महांकाळवाडगाव, मोनिका पगारे माळेवाडी आदींना शेळी वाटप उद्योजक किशोरअण्णा निर्मळ, प्राचार्य टी इ शेळके, प्रा.कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजन बी आर चेडे यांनी व आभार प्रदर्शन डॉ बाबुराव उपाध्ये यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या