चर्मकार संघर्ष समिती आयोजित श्रीरामपूरात चर्मकार समाजाचा भव्य दिव्य तालुका मेळावा संपन्न

सर्व समाजाकरीता सहकारी तत्वावर लघुउद्योग सुरु करण्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांचा विचार

अहमदनगर/ जावेद शेख : चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्मकार संघर्ष समिती, श्रीरामपूर चर्मकार समाजाचा मेळावा रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आला.

या मेळाव्यामध्ये चर्मकार संघर्ष समिती श्रीरामपूर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तथा पदाधिकाऱ्यांना श्री.साळवे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रही बहाल करण्यात आले. या कार्यकारणीत दिलीप कारभारी शेंडे (जिल्हा संघटक), संजय दळवी (श्रीरामपूर तालुकाध्यक्ष), कर्णासाहेब कापसे (श्रीरामपूर शहराध्यक्ष), सौ.इंदूताई नामदेव नन्नवरे (श्रीरामपूर शहराध्यक्षा), तसेच सर्व पदाधिकारी यांच्या नियोजनाखाली अतिशय दिमाखदार पद्धतीने समाज बांधवांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी त्यांचे समाजाविषयी मनोगत व्यक्त केले. व एकमेकांच्या साथीने समाजाचं स्थान निश्चितपणे उंचावले जाईल, समाजाला निश्चितपणे मदत केली जाईल, याविषयी त्यांनी असे चांगल्या आपल्या विचारातून मनोगत व्यक्त केले.

चर्मकार संघर्ष समितीचे असं वेगळं वैशिष्ट्ये म्हणजे संघर्ष समितीच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराची निवड करण्यात आली. ज्यांनी समाजासाठी, देशासाठी, अतिशय महत्त्वाचे योगदान दिलेले आहे अशा व्यक्तींना शिवाजीराव साळवे आणि पदाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन मान्यवरांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव साळवे (संस्थापक अध्यक्ष चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य) राज्यातील चर्मकार संघर्ष समितीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कडूबाळ काकडे (पानेगांव), संजय पाटील जंगले (संचालक -मुळा सह. सा. कारखाना सोनई), रमेश मकासरे (महासचिव, बामसेफ, अशोकराव पाटील नांदे (सामाजिक कार्यकर्ते पाचेगांव), शिवाजीराव गांगुर्डे (प्रदेशाध्यक्ष, एकलव्य भिल्ल समाज संघटना ), श्री भांडे साहेब ( शिवप्रहार जिल्हा सचिव), अमोल गोपीचंद शेळके (नायब तहसीलदार), शिवाजीराव जाधव (सामाजिक कार्यकर्ते), भारत तुपे (सरपंच - भैरवनगर ग्रामपंचायत), संजय तुपे, संजय माधव वाघ (तालुकाध्यक्ष गुरुकुल श्रीरामपूर) तसेच समाज बांधव, संघटनेचे पदाधिकारी, महिला भगीनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी समाजाविषयी तळमळीने, एकजुटीने, समाजाला सामाजिक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करू अशी भावना प्रकट केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या