आडगाव सोसायटीवर लोंढे यांची एक हाती सत्ता

पाथर्डी : तालुक्यातील आडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी पुत्र जिजाबा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा विकास मंडळाने दणदणीत विजय मिळवला आहे.

आडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक आज पार पडली. जनसेवा विकास मंडळाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाल्याने जिजाबा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत त्यांची एक हाती सत्ता आली आहे.

या निवडणुकीत लोंढे जिजाबा तात्याबा, एडके नंदाराम पांडुरंग, तमनर बबन शिवराम, नजन गोवर्धन रभाजी, भानगुडे रामनाथ रेवणनाथ, लोंढे अबांदास तुकाराम, लोंढे कारभारी बाबुराव, लोंढे परसराम नामदेव, लोंढे रामनाथ धोंडीबा, वाघमोडे भिवाजी कारभारी, आखाडे अशोक दगडु, भानगुडे विमल तबाजी, लोंढे तान्हाबाई विक्रम आदी उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालानंतर लोंढे यांनी मतदार बंधु भगिनींचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या