रेड क्रॉस सोसायटी आयोजित स्वास्थ्य बालक, बालिका स्पर्धा; नावनोंदणी करण्याचे आवाहन

अहमदनगर/ जावेद शेख : केंद्रीय आरोग्य मंत्रालय व इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथे स्वास्थ्य बालक, बालिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सचिव सुनील साळवे यांनी दिली.

या स्पर्धेत 0 ते 6 वयोगटातील बालक, बालिका सहभागी होऊ शकतात. या वयोगटातील बालके बालवाडी, आंगणवाडी, पहिली या वर्गात अथवा घरी असू शकतात. 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या पालकांनी अथवा शिक्षकांनी अशा बालकांची नावे पुढील माहितीत द्यावी, बालकांचे नाव, जन्मतारीख, वजन, उंची इ. माहिती दि. ५ एप्रिल २०२२ पर्यंत नक्षत्र कलेक्शन महात्मा गांधी पुतळ्याजवळ श्रीरामपूर येथे द्यावी. या माहितीतून सदृढ बालक, बालिकांना बक्षीस देण्यात येणार आहे.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सुनील साळवे, पोपटराव शेळके, प्रवीण साळवे, सुखदेव शेरे, श्रावण भोसले, पुष्पा शिंदे, राजेंद्र केदारी, वर्षा दातीर, शोभा शेंडगे, सविता साळुंके, सुप्रिया साळवे, दिपाली ठाणगे, बाळासाहेब पाटोळे, बदर शेख, शुषमा कांबळे, विनीत कुंकुलोळं, सागर गिरनारे, वैष्णवी वाडकर, सुरेश वाघुले तथा सर्व युवा रेड क्रॉस सदस्य परिश्रम घेत आहेत. जास्तीत जास्त बालकांची माहिती देऊन स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन रेड क्रॉस सोसायटी अध्यक्ष प्रांताधिकारी अनिल पवार, उपाध्यक्ष तहसीलदार प्रशांत पाटील, सचिव सुनील साळवे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या