प्रनिल काळे यांचे शालेय शिक्षण अमानविश्व हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शिक्षण देवगिरी महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कृषी महाविद्यालय, कांचनवाडी येथे बी.एससी. कृषी ची पदवी संपादन केली, तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी च्या पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन संस्था, चाकूर येथे एम. बी. ए. कृषी चे पदव्युत्तर पदवी संपादन करून सुवर्णपदक देखील मिळवले आहे.
प्रनिल यांनी एम. बी. ए. कृषीचे शिक्षण पूर्ण करून दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कृषी महाविद्यालय, कांचनवाडी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे. प्रनिल यांचे वडील एल. आय. सी. मध्ये नोकरी करतात तसेच विमा कामगार संघटना, औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष देखील आहेत.आई-वडिलांचा आणि परीवाराचा पाठींबा यामुळे हे शक्य झाल्याचे प्रनिल सांगतात.
0 टिप्पण्या