
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : तेजस्विनी फाउंडेशन व जिजाऊ मराठा महिला मंडळ श्रीरामपूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या वर्षीचा "जिजाऊ स्त्री सन्मान" पुरस्कार खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर या शाळेतील शिक्षिका कवयित्री श्रीमती संगीता चंद्रभान फासाटे (कटारे ) यांना प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार जिजाऊ महिला मंडळाच्या संस्थापक विश्वस्त कल्पनाताई बनकर, प्रा. रूपाली बनकर, डॉ. स्वाती चव्हाण, अध्यक्षा भारती काळे, माजी अध्यक्षा निशा निर्मळ, सचिव नलिनी कुटे, खजिनदार शोभा वारूळे, कार्यकारणी सदस्या अलका पवार, सुरेखा आभाळे, मयुरा निंबाळकर, रंजना कडु, तसेच प्रेरणा फाऊंडेशनच्या डॉ. प्रेरणा शिंदे, ईनरव्हिल क्लबच्या ममता गुप्ता, कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सिंधु पडघन, डॉ. ज्योस्ना तांबे, आढाव, शशिकला शिंदे, उषा गाडेकर, भाग्यश्री बडदे या मान्यवर महिलांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कवयित्री संगीता फासाटे यांना शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमाची आवड असुन अनेक गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना त्या नेहमी मदत करत असतात तसेच त्यांना साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
या पुरस्काराबद्दल साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मा.नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, जयश्रीताई काचोळे, सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, अर्चनाताई पानसरे, रेवतीताई चौधरी, ज्योतीताई कवडे, वंदना आदिक, डॉ. शलाका आदिक, ज्योती कवडे, सुनीता धुमाळ, सीमा जाधव यांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या