संगमनेर /बाळासाहेब भोर : तालुक्यात सध्या मागील तीन - चार दिवसांपासून काही गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
सध्या शेतातील गहू, हरभरा, कांदा हा परिपक्व झालेला माल सध्या सुरु असलेल्या बेमोसमी पावसामुळे खराब होऊ लागला आहे. तसेच इतर भाजीपाला पिके, चारा पिकांचेही वादळ वाऱ्यामुळे खुप नुकसान झाले आहे. ढगाळ हवामानामुळे भाजीपाला पिकांवर मावा, तुडतुडे, करपा, बुरशीजण्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
कांदा बियाणासाठी लावलेले डेंगळे हे सध्या पूर्णतः फुलले असून बीजधारणेच्या प्रक्रियेत असून त्यात घट येऊन या वर्षी पुढे कांदा बियांनांचाही तुटवडा निर्माण होऊ शकतो. अगोदरच सततचे खराब हवामान त्यात मशागत, खते, औषधे यांच्या वाढलेल्या किंमती, विजेचा सुरु असलेला लपंडाव व आता अवेळी पडणारा पाऊस यामुळे हातातोंडाशी आलेला घास पुन्हा मातीमोल होतो की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
0 टिप्पण्या